होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon weather update : तापमानात वाढ, जाणून घ्या पुढील चार दिवस कशी राहील स्थिती ?

On: January 19, 2026 5:10 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon weather update : जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर ओसरला आहे. रात्रीचा पारा १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावला आहे. दरम्यान, आगामी २४ जानेवारीपर्यंत तापमानात मोठी घट होण्याची शक्यता कमी असून, थंडीचे प्रमाण मध्यमच राहणार आहे. मात्र, २६ जानेवारीनंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला होता, मात्र त्यानंतर काही दिवसांत अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे.

रात्रीचा पारा १० ते १४ अंशांपर्यंत गेल्याने रात्री जाणवणारा गारवा काहीसा कमी झाला आहे. आगामी चार ते पाच दिवस हे तापमान १० ते १३ अंशांच्या दरम्यान स्थिर राहील, असा अंदाज आहे.

धुक्याचे प्रमाण वाढणार?

थंडी कमी असली तरी, २४ जानेवारीपर्यंत सकाळी वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे रब्बीच्या पीकांवरदेखील परिणाम होऊ शकतो. २४ तारखेपर्यंत थंडीचा फारसा प्रभाव जाणवणार नसला तरी, उत्तरेकडील वारे पुन्हा सक्रिय झाल्यास २६ जानेवारीपासून जिल्ह्याला पुन्हा हुडहुडी भरू शकते.

थंडी कमी होण्याचे नेमके कारण काय..?

वाऱ्याची दिशा बदलली : सध्या हिमालयात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असली तरी, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा ओघ हरियाणा आणि राजस्थानमार्गे पाकिस्तानकडे वळला आहे.

मध्य प्रदेशचा प्रभावः उत्तरेकडील वाऱ्यांचा केवळ थोडासा भाग मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात येत असल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे.

ढगाळ हवामानः राज्यात स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे ‘टेम्परेचर ट्रॅपिंग’ होऊन रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment