होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Bhusawal combing operation news : भुसावळात कोम्बिंग ऑपरेशन; ४० लाखांचे सोन्याचे लगड जप्त

On: January 20, 2026 4:50 AM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal combing operation news : भुसावळ शहरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी तब्बल ४० लाख २५ हजार रुपये किमतीचे २८७.७ ग्रॅम वजनाचे वितळविलेले सोन्याचे लगड, गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच १६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

मध्य प्रदेशातील बडोद पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी करारअली हुजुर अली हा भुसावळ येथील मुस्लीम कॉलनी परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १५ जानेवारी रोजी रात्री पोलिस पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांवर दगडफेक करुन लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यात आली होती.

यानंतर रविवारी रात्री या भागात कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. एका घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे लगड आढळून आले. चौकशीत मरीयम बी. जाफर अली जाफरी व नाजीया टिपू शेख यांनी हे लगड आणल्याचे कबूल केले.

जळगाव, अमरावतीसह मध्य प्रदेश व इतर ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेणाऱ्या टोळीने हे दागिने त्यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले गेले.

१६ सोन्याच्या लगडी जप्त

या कारवाईत एकूण १६ सोन्याच्या लगडी जप्त करण्यात आल्या. त्याचे वजन २८७.७ ग्रॅम व किंमत सुमारे ४० लाख २५ हजार रुपये आहे. याशिवाय मजहर अब्बास जाफर इराणी (वय १९) याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १६ मोटारसायकली जप्त

कोंबींगदरम्यान ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक वाहन मुक्ताईनगर येथील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल तब्बल १६ हुन अधिक गुन्ह्यांत या टोळीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

अमळनेरला गुडघा-खांदा आजारांवर तज्ज्ञ उपचारांची सुविधा; येत्या मंगळवारी प्रसिद्ध डॉ. पियुष वसईकर यांची सेवा उपलब्ध

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Leave a Comment