होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक; महिला व बालविकास कार्यालयात धडक!

On: January 27, 2026 8:05 AM
Follow Us:
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारला सत्तेत आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता मात्र महिलांच्या असंतोषचं कारण ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. योजनेचे १५०० रुपये खात्यात जमा न झाल्याने शेकडो महिलांनी जळगावच्या महिला व बालविकास कल्याण केंद्रात धडक दिली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

”लवकरात लवकर लाडक्या बहीण योजनेचे पैसे द्यावेत”, अशी भूमिका घेत महिलांनी कार्यालयात जोरदार आंदोनल सुरु केलं आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून तातडीने तोडगा काढला जातो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

योजनेतर्गत जळगाव जिल्ह्यात दहा लाखांहून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत, मात्र केवायसी पूर्ण करूनही एक लाखांपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा न झाल्याने आजचा हा उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे.

हेल्पलाईन १८१ ठरतेय निष्प्रभ

लाडक्या बहिणींना येणाऱ्या अडचणींसाठी १८१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक महिलांचा हेल्पलाईनवर संपर्क होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी महिलांमध्ये अधिकच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment