होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

ZP Election Postponed : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात बदल, आता ‘या’ तारखेला होणार मतदान

On: January 29, 2026 7:45 PM
Follow Us:
---Advertisement---

ZP Election Postponed : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर १२  जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अर्थात ५ फेब्रुवारी २०२६  ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ६  फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९  फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आता ७ फेब्रुवारीला मतदान

त्यामुळे आता ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ६ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येणार आहे.  

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment