होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

चीनचे चालले तरी काय? ड्रॅगन जगभरातील समुद्र तळाची नकाशे बनवतोय!

On: March 26, 2026 1:47 PM
Follow Us:
---Advertisement---

China Mapping The Ocean Floor: एकीकडे अमेरिका इस्रायल युद्ध सुरू आहे. तर पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. अशातच तैवानच्या हवाई सीमेचे वेळोवेळी उल्लंघन करत आहे. जग एका विचित्र परिस्थितीतून जात असतानाच, एक महत्त्वाची बातमी येऊन धडकली आहे. जागाच्या नजरा इराण युध्दाकडे असतांना चीन जगभरातील समुद्रांच्या तळाचा नकाशा बनविण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त रॉयटर वृत्तसंस्थेने दिले आहे. या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. नेमके चीनच्या मनात काय आहे,असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे.

चीनच्या कुरापत्या आताच सुरू झाल्या असे नव्हे अनेक दशकापासून तो हे करतोय, आपला व्यावसायिक आणि सामरिक मार्ग खुला राहावा यासाठी चीनची ही सर्व धडपड दिसून येत आहे. चीन भारत अणे त्याच्या आजूबाजूंच्या देशांमध्ये आपले नौसेना तळ बनविले, श्रीलंका , म्यानमार सारख्या देशांना कर्ज देऊन आपल्या जाळ्यात ओढले असून कर्ज फेडता आले नाही तर त्या देशांचा एखादा भूभाग बळकावयाचा आणि त्यासाठी स्पाय व्हेसल्स आणून भारताच्या हददीतील समुद्रतळाचे नकाशे काढायचे आणि ते आपल्या सबमरीन रस्ता मोकळा करण्याचा मार्ग अवलंबवित आहे. भारत त्यांच्या अशा कुरापतींबाबत पहिल्यापासून सावध आहे. त्यासाठी भारत ही आपली सबमरीन क्षमता वाढवता आहे.

नकाशे बनविण्याचे चीन पहिल्यापासून बनवत आहे. आता नवीनच माहिती समोर आली आहे. चीन सागरी पाणबुडी युद्धाची तयारी करत आहे. त्यासाठी तो समुद्राच्या तळाचा नकाशा बनवत आहे. जागतिक महासागरातील सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या समुद्राच्या तळाचा नकाशा तयार करण्याच्या मोहिमेवर डझनभर चिनी संशोधन जहाजे आहेत. त्यामुळे चीन अमेरिकेविरुद्ध सबमरीनला सुरक्षित सागरी रस्ता बनविण्यासाठी तयारी करत असल्याचं स्पष्ट होत आहे. यापूर्वी ही चीन भारतीय हिंद महासागरात वेळोवेळी आणि प्रशांत महासागरात आपल्या समुद्राची मॅपिंग करणारी जहाजे पाठवत आहे. भारताच्या क्षेपणास्त्र चाचणी वेळी अनेक वेळा त्याचे स्पाय वेस्लस हेरगिरी करणारे जहाजे भारतीय सागरी हद्दीत दिसून येतात, श्रीलंकेच्या सागरी तटावर अनेकदा अशी जहाजे दिसली आहे. त्यामुळे चीनच्या सर्व हालचालींवर भारतीय नौदलाची गुप्तपणे नजर आहे. चीनबाबत भारतीय नौसेना कायमचं सावध राहते. चीनची प्रत्येक चाल उधळून लावण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे. त्यासाठी भारत स्टेट ऑफ मल्लका येथे मोठा बेस तयार करत आहे, येथून चीनवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. चीनची याव्दारे आर्थिक कोंडी करता येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment