World Theater Day: रंगभूमी ही काही लोकांचा जीव की प्राण आहे. ते त्याशिवाय जगू शकत नाही, काहींमध्ये हळूहळू रुजू लागते, खरे तर रंगभूमीचे महत्त्व जगापर्यंत पोहोचावे आणि लोकांमध्ये त्याविषयी रुची निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १९६२ मध्ये झाली. रंगभूमी हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचण्याचे ही एक उत्तम माध्यम आहे. रंगभूमीशी चाहते थेट प्रत्यक्ष जोडलेले असतात, त्यातील जिवंतपणा अवर्णनीय आहे. त्यामुळे याची रुची ठेवणारे लोक आज ही आहे. रंगभूमीकडे वळणारी एक पिढी आज ही आपल्याकडे आहे. सोशल असो की आणखी इतर करमणुकीचे किती ही माध्यमं असो रंगभूमीची बात काही वेगळीच आहे. त्यामुळे एकदा तरी रंगभूमीचा जिवंत अनुभव घेतला पाहिजे.
या दिनाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे आहे. साधारण १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूटद्वारे (आयटीआय) वर्ल्ड थियेटर दिवस सुरू करण्यात आला. २७ मार्च रोजी आयटीआय केंद्र आणि आंतरराष्ट्रीय थिएटर समुदायाच्या वतीने दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रंगमंच कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जगातील थिएटर दिवस हा इंटरनॅशनला डे हा ‘आयटीआय’च्या वतीने एक थीम ठेवून साजरा केला जातो. बहुतेक वेळा शांतीचे प्रतीक ठेवून जगभरात तसा संदेश पोहचविण्याचे काम संघटना करत असते. १९६२ मध्ये थिएटर दिवसाचा पहिला संदेश फ्रान्सचे जीन कोका यांनी लिहिल्याचे सांगितले जाते. आयटीआयच्या ९ व्या वर्ल्ड काँग्रेसच्या वतीने त्यांना संधी मिळाली. वर्ल्ड थिएटर ‘डे ‘ ची स्थापना स्कॅन्डिनेव्हियन केंद्रांद्वारे प्रस्ताव देण्यात आला होता, त्यानंतर त्याची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते.
सिनेमा आणि दूरदर्शनच्या जगातही आज रंगभूमीचे महत्त्व तसूभर ही कमी झालेले नाही, २०२४ मध्ये वर्ल्ड थियेटर ‘डे ‘ ला आता ६२ वर्ष झाले असून त्याच्या पुढील आवृत्तीत प्रवेश करत आहे. या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन नॉर्वेजियन लेखक आणि नाटककार जॉन फोस यांनी थिएटरच्या मुल्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले होते. रंगभूमीच्या समूहाचा भाग होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. या बघा आणि अनुभव घ्या. रंगभूमीच्या विविध बाबी आहे, त्यात सहभागी व्हा!, कला, नेपथ्य, संगीत, निर्देशन, कलाकार म्हणून ही यात सहभाग घेता येतो. तसेच विपणन विभाग देखील आहे. या सगळ्यांची गरज भासू शकते.
प्रशासकीय लोक जाहिरात चमू किंवा तिकीट विक्री टीमसोबत मिळून बॉक्स ऑफिसचे कामकाज सुरळीत चालेल यासाठी योगदान देऊ शकतात. एक चांगला ‘शो’ सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वी करू शकतो. तसेच विविध माध्यमातून सहभाग घेऊन जागतिक रंगभूमी दिन अविस्मरणीय बनवला जाऊ शकतो, त्यासाठी आता योग्य काळ आहे.
जागतिक रंगभूमी दिनाचा संदेश
दरवर्षी, आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेतर्फे रंगभूमीच्या विविध स्वरूपांशी संबंधित असलेल्या किंवा तिचे महत्त्व पटवून देणारे संदेश दिला जातो. रंगभूमीकडे लोकांना वळविण्यासाठी प्रोत्साहन देणारा संदेशाची परंपरा आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त दरवर्षी एक संकल्पना राबवली जाते, रंगभूमी दिनी शांतता आणि संस्कृती यावर भर दिला जातो. रंगभूमीवर अनेक ज्वलंत विषयावर नाटके सादर केली जातात. ती सामाजिक प्रश्नांशी थेट जोडलेली असतात. त्याचा थेट प्रभाव प्रेक्षकांवर होत असतो.
हे संदेश सामान्य प्रश्नांवर खोल परिणाम करतात त्यांना सामाजिक परिस्थितीवर विचार करण्यास भाग पाडते. असे जिवंत माध्यम याचा प्रत्येकाने एकदा तरी सहभाग घ्यावा हे सांगणारा दिवस आहे. नाटके विविध भाषांमध्ये भाषांतरित केले जाऊन त्याचे सादरीकरण केले जाते. भाषेला कुठले बंधन नाही तसेच थिएटरचे देखील आहे. जगात कुठेही तुम्हाला तुमची कला सादर करता येईल, म्हणूनच थियेटरने जग आणखी जवळ आले आहे. जगभरातील विविध देशांतील संस्कृती आणि सभ्यता लोकांना पहायला आवडेल आणि आनंद घेता येईल. रांगमंचाला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. तुम्हाला घर बसल्या आता कुठल्याही नाटकाचे तिकीट बुक करता येते. आणि रंगभूमीवरील चाहत्यांचे प्रेम आज ही कायम आहे आणि पुढे ही कायम राहील याबाबत दुमत नाही.










