होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

फडणवीस यांचा मोठा निर्णय; खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची करणार ईडी चौकशी!

On: April 5, 2026 5:46 PM
Follow Us:
---Advertisement---

Fadanvis Statment On Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढणार आहे. माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहार तापसण्यासाठी ईडी चौकशी करणार असल्याची माहिती दिली. दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशोक खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची चौकशी केले जाणार आहे. खरात प्रकरणात काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या प्रकरणाविषयी सरकारला जे करायला पाहिजे ते सरकार करत आहे,

तसेच अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. एसआयटी या प्रकरणाचा योग्य तपास करत आहे. ‘एसआयटी’वर विश्वास ठेवा असे त्यांनी स्पष्ट केले. ईडीनेही त्यांची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा खरातच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती समजली की नियमानुसार जे-जे करावं लागेल ते आम्ही करणार आहोत, असे म्हणाले.

सीडीआर लीकची चौकशी

दरम्यान खरात प्रकरणाचा सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.तो फक्त ज्या तपास यंत्रणा आहे. सीडीआर कसा लीक झाला? तो कोणी लीक केला, याची राज्य सरकार चौकशी करणार आहे. या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालणार नाही. जो दोषी असेल किंवा पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. परंतु कोण-कोणाशी बोलले या आधारावर आपली गुन्हे विषयक न्याय प्रणाली चालत नाही, या कायदेशीर बाबींविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिले दरम्यान ईडी चौकशीमुळे खरातशी आर्थिक लागेबांधे असणाऱ्या संपर्कातील लोकांचे धाबे दणाणले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment