होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

रेल्वेतर्फे स्वयंचलित दरवाजे असणारी १२ डब्यांची ‘इएमयू’ रेक सादर; नव्या रेकने प्रवाश्यांच्या सुरक्षिततेवर भर..

On: April 18, 2026 4:19 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusaval News: मध्य रेल्वेने स्वयंचलित दरवाजा बंद होण्याच्या सुविधेने सुसज्ज असलेली अत्याधुनिक १२ डब्यांची विना-वातानुकूलित ‘इएमयू’ रेक सादर केली आहे, ज्यामुळे उपनगरीय रेल्वे सुरक्षा आणि प्रवासी सोयीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. नव्याने विकसित केलेल्या या रेकमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी केंद्रित वैशिष्ट्ये एकत्रित केली आहेत, तसेच विना-वातानुकूलित उपनगरीय सेवांची परवडणारी किंमत आणि सुलभता कायम ठेवली आहे. विशेषतः मुंबईसारख्या जास्त गर्दीच्या उपनगरीय विभागांमध्ये हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या प्रवासी सुरक्षा सुधारण्याच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.

स्वयंचलित दरवाजा असलेल्या नवीन विना-वातानुकूलित इएमयू रेकची प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहे. अँटी-ड्रॅग वैशिष्ट्यासह स्वयंचलित दरवाजा प्रणाली, या रेकमध्ये अँटी-ड्रॅग यंत्रणा असलेले प्रगत स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे (फेवेली बनावटीचे) बसवलेले आहेत, जे अपघाती पडणे आणि असुरक्षित प्रवास पद्धती टाळून प्रवाशांची सुरक्षितता लक्षणीयरीत्या वाढवतात.

प्रवाशांच्या आरामासाठी सुधारणा

* रेकला अधिक रुंद दरवाजे आणि सुधारित ग्रॅब पोलची व्यवस्था देण्यात आली आहे,
* द्वितीय वर्गात स्टेनलेस स्टीलची आसने आणि प्रथम वर्गात गादीची आसने आहेत,
* दरवाजांवर लूव्हर्स आणि रुंद खिडक्या देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे दरवाजे बंद असतानाही हवेचा चांगला प्रवाह आणि नैसर्गिक प्रकाश मिळतो,
* रूफ माउंटेड व्हेंटिलेशन युनिट्स (RMVU) आहेत, जे सध्याच्या प्रणालींपेक्षा जास्त, म्हणजेच १०,००० m³/तास या दराने ताजी हवा पुरवतील.
* प्रवाशांची ये-जा आणि हवा खेळती राहण्यासाठी, तसेच रेकमध्ये गर्दीचे आणि हवेचे चांगले वितरण सुनिश्चित करण्यासाठी, एकमेकांना जोडलेल्या डब्यांसह (६+३ रचना) उत्तम व्हेस्टिब्युल कनेक्टिव्हिटी (अर्धे गँगवे) देण्यात आली आहे.

सुधारित आपत्कालीन वैशिष्ट्ये

* रेकमध्ये बाह्य रीसेट सुविधेसह सुधारित आपत्कालीन अलार्म प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे गर्दीच्या डब्यांमध्ये प्रवेश न करता त्वरित प्रणाली पूर्ववत करता येते.
* आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर काढण्यासाठी अनेक ठिकाणी सरकत्या दरवाजांचे नळीच्या आकाराचे विभाजक बसवण्यात आले आहेत.
* आपत्कालीन परिस्थितीत अधिक सुलभतेने पोहोचता यावे यासाठी रुंद शिड्या देण्यात आल्या आहेत.

सुरक्षितता आणि सुरक्षा

* रेकमध्ये प्रगत अशी धूर आणि उष्णता ओळखणारी प्रणाली, तसेच जलद प्रतिसादासाठी ड्रायव्हिंग कॅबमध्ये सतर्कता यंत्रणा बसवलेली आहे.
* प्रवासातील सुरक्षा आणि देखरेख वाढवण्यासाठी सर्व प्रवासी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत.

कर्मचारी-अनुकूल वैशिष्ट्ये
* कर्मचारी आवाज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रणाली (CVVRS) स्थापित
* कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी वातानुकूलित ड्रायव्हिंग कॅब.

विना-वातानुकूलित उपनगरीय गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजा बंद करण्याची सुविधा सुरू करणे, हे क्षमतेशी तडजोड न करता प्रवाशांची सुरक्षा वाढवण्याच्या दिशेने उचललेले एक परिवर्तनकारी पाऊल आहे. या डिझाइनमध्ये व्हॅस्टिब्यूल्स (प्रवेशद्वार) आणि उच्च-क्षमतेच्या व्हेंटिलेशन सिस्टीमसारख्या नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी उपायांद्वारे व्हेंटिलेशनच्या (हवा खेळती ठेवण्याच्या) आव्हानांवरही तोडगा काढण्यात आला आहे.

 

 

.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment