होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वीज कामगारांवर कपातीची टांगती तलवार; मजदूर संघाचे कपाती विरोधात आंदोलन 

On: May 27, 2026 12:40 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: ओडिशातील वीज वितरण क्षेत्रातील तब्बल दहा हजारांहून अधिक कंत्राटी व बाह्यस्रोत वीज कामगारांच्या कथित बेकायदेशीर कपाती विरोधातमहाराष्ट्र वीज कामगार महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांच्या विविध झोन कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. नाशिक रोड येथील वीज भवन येथे आंदोलन व व्दार सभा झाली.

 

अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. ओडिशामध्ये टाटा पॉवरअंतर्गत कार्यरत असलेल्या चार वीज वितरण कंपन्यांनी खर्च कपातीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप आहे. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, वीज वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

वीज वितरण ही अत्यावश्यक सार्वजनिक सेवा असून, अनुभवी तांत्रिक कामगारांना अचानक कमी करणे हे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा महासंघाने केला आहे. महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांनी ओडिशातील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. महासंघाने ओडिशातील सर्व कामगारांना रोजगार

सुरक्षा द्यावी, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशनच्या धर्तीवर बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना थेट कंत्राटी तत्त्वावर सामावून घेणारे सुरक्षित रोजगार मॉडेल लागू करावे, वीज कामगारांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षा उपकरणांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे. यावेळी विठ्ठल बागल, युवराज बैसाणे, राजेश कुलकर्णी, तुकाराम गावित, कुंदन भास्करे, सुनिल पाटील, हर्षल काटे, दिपक चौधरी, राजु पठाण, श्रीकृष्ण बढे, रविंद्र शिंदे, महेश शिंदे, प्रविण वावगे, भाऊसाहेब कांडेकर, निवेळ वाणी, नितीन शिंदे, सचिन गायकवाड, दिनेश शिंदे, दिनेश बागुल, प्रकाश डोके, पांडुरंग हांडगे, दिनेश जोशी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment