होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना अभिनेते परेश रावल यांचे समर्थन; मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

On: August 10, 2026 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

IAS Tukaram Mundhe: राज्यभर अन्नभेसळ आणि प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा अधून मधून होत असते. मात्र मुंढे यांनी राज्यात अन्न भेसळ करणाऱ्याना वठणीवर आणल्याने त्यांना मोठा जनाधार देखील मिळत आहे. आता ही सजग नागरिक मुढे यांच्या बदलीला विरोध करत असून यापूर्वी ही मुंढे यांच्या बदलीला विरोध केला होता. त्यातच जेष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मुंढें यांना पाठींबा दिला असून त्यांनी मुंढे यांच्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे. त्यांनी या संदर्भात आपल्या ‘एक्स’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी थेटपणे तुकाराम मुंढे यांची बाजू घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना मुंढे यांची बदली करू नये, अशी विनंती केली.

अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले, “तुकाराम मुंढे यांची बदली करू नये किंवा त्यांना अन्न व औषध प्रशासन विभागातून हटवू नये,” अशी मागणी केली आहे. “अन्न व औषध प्रशासन विभागातून त्यांची बदली होणार नाही किंवा त्यांना हटवले जाणार नाही, असे परेश रावल म्हणाले” तुकाराम मुंढे करत असलेल्या कामाचे सर्वसामान्य जनता स्वागत करत असून मुंढेंना त्यांच्या कार्यामुळे मोठे समर्थन मिळत आहे.

मुंढें यांचा धडाका सुरूच

दरम्यान तुकाराम मुंढे थांबायला तयार नाही, बदली करा किंवा नका करू ते आपले काम त्याच जोमाने करत आहे. त्यांना बदलीची फारशी चिंता नाही त्यामुळे त्यांचा एका मागून एक निर्णय घेण्याचा धडाका सुरूच आहे. त्यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे की, शाळांच्या परिसरातील जंक फूडची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट निगडित मुद्द्याला त्यांनी हात घातला आहे. आता शाळांच्या आसपास विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि विक्रीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न विकणारे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम त्यांनी उघडण्याचे संकेत दिले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment