चोपड्यात ‘कोबिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गुन्हेगार अन् अवैधधंदे चालकांच्या आवळल्या मुसक्या..
police launch a bold combing operation in chopda city
action of criminals and operators of illegal businesses, chopda crime, jalgaon crime news, chopda criminal action, chopda news, combing operation, police operation, गुन्हेगार आणि अवैध व्यवसाय चालकांची कारवाई, चोपडा गुन्हा, जळगाव गुन्हेगारी बातम्या, चोपडा गुन्हेगारी कारवाई, शोधमोहीम, पोलीस कारवाई,
Chopda News: चोपडा शहर पोलीस ठाण्याचे धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांनी अवैध धंदे चालकांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. या दरम्यान अवैध धंदे चालकांच्या चांगल्याच नांग्या ठेचण्याचा सपाटा त्यांनी लावला असून अवैध वाहनचालक असो, वा विना लायसन ट्रिपल सिट चालक असो, गावठी हातभट्टी दारूअड्डा चालक असो, अशा सर्वच गुन्हेगारांवर कारवाई करून कायद्याचा धाक बसवला आहे. विशेष म्हणजे कत्तल खाण्यात गुरांना नेणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मोठी कारवाई सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सट्टा जुगार खेळणाऱ्यांनाही “सळो की पळो “करून सोडले आहे. त्यांच्या या कामगिरीने चोपडावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ अधिकारी लाभल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहे.
दारूचे अड्डे उद्धवस्त
दरम्यान हे कोंबिंग ऑपरेशन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व चाळीसगाव विभाग अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशान्वये चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील रामराव पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांची टीमद्वारे चोपडा शहर पोलिस ठाणे हद्दीत राबविण्यात आले. पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीतून दारूबंदीच्या पाच केसेस दाखल केलेल्या आहेत. चहार्डी येथील कमळजादेवी प्लॉट भागात पितांबर दंगल कोळी यांची ३०० लिटर दारू जप्त केली आहे.तर रुखनखेडा गावातील भिलाटी भागातील शिवाजी भिका भील यांच्याकडून २५ लिटर गावठी दारू, मामले येथील वसंत पुन्हा भिल यांची ३५ लिटर, कारगिल चौकातील तुषार राजेंद्र महाजन २५ लिटर व पाटीलगढीतील पारधीवाढ्यातील राजेंद्र पूनमचंद पारधी यांचे २० लिटर दारू जप्त करून कडक कारवाई केली आहे.
जुगार अड्ड्यावर कारवाई
त्याचप्रमाणे चोपड्या शहरातील राज पॅलेस मागील भागात प्रशांत ज्ञानेश्वर कोळी, विजय रवींद्र कोळी, भरत माधव गवळी या तिघांवर जुगार प्रकरणी गुन्हा दाखल करून एक लाख ६६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस ठाण्यात येथील १० हीस्ट्री शिटरांना आणण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या १६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तंबाखूजन्य पदार्थ जप्त
दरम्यान अन्नभेसळ विभागाच्या कायद्यानुसार सिगारेट आणि तंबाखू विक्री प्रकरणात मेणबत्ती चौकातील सावित्रीबाई फुले नगरपालिका शाळेच्या जवळील हेमंत पान सेंटर व मातोश्री पान सेंटर या दुकानांवर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. शिवाय मोटार वाहन कायद्याप्रमाणे विना हेल्मेट तीन जणांवर तीन हजाराच्या दंड करण्यात आला आहे.ट्रीपलसीट तीन जणांवर तीन हजार रुपयांच्या दंड करण्यात आला आहे.
नियमनाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई
मालवाहू वाहनातून इसमांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर एक हजार रुपये प्रमाणे दंड करण्यात आला आहे .विना लायसन्स प्रकरणी सहा जणांवर गुन्हा नोंदवून ३ हजारचा दंड वसूल करण्यात आला आहे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या चार केसेस दाखल करण्यात आल्या असून प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आला आहे.

शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी १५ जणांवर प्रतिबंधित कारवाई करण्यात आली आहे. जवळपास पाच हॉटेल व लॉजची तपासणी करण्यात आली असून पकड वॉरंट म्हणून चार जणांवर तर जमानती वारंट म्हणून सहा जणांवर तर ५१ जणांवर समंस बजावण्यात आला आहे. गेल्या कालखंडात बेपत्ता झालेल्या १६ जणांपैकी तपासात तीन जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
यांनी कारवाईत सहभाग घेतला
हे कोबींग ऑपरेशन यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या समवेत ५ दुय्यम अधिकारी व ३० अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा कडे १ अधिकारी, १० अंमलमदार यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व टीमच्या कार्याची चोपडा शहरातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे. या कारवाईमुळे चोपडा शहरात नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.










