होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Finance Tips : रोखीने घर खरेदी करावे की कर्ज घेऊन, कोणता पर्याय योग्य? जाणून घ्या..

On: February 11, 2026 12:10 PM
Follow Us:
---Advertisement---

Finance Tips: स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर खरेदी करणे हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय मानला जातो. त्यासाठी फक्त पैसेच लागत नाहीत तर संपूर्ण नियोजन, योग्य वेळ आणि आर्थिक समज देखील महत्त्वाची ठरते. आजकाल विविध बँकांकडून  गृहकर्ज सुलभतेने मिळतं. असे असले तरी पूर्ण रक्कम भरून रोखीने घर खरेदी करायचे की गृहकर्ज घ्यायचे हा निर्णय अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. मालमत्तेच्या वाढत्या किमतींमुळे, हा प्रश्न आणखी महत्त्वाचा झाला आहे. अशात तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वची आहे. या लेखात घर खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता याचा शोध घेऊया.

आर्थिक तज्ञ सांगतात की, घर खरेदी करताना फक्त तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाही हे पाहणे पुरेसे नाही. खरा प्रश्न हा आहे की, ते पैसे कुठे गुंतवले जातात आणि त्यातून किती परतावा मिळतो. जर तुमची बचत अशा ठिकाणी गुंतवली गेली असेल जिथे वार्षिक 15 टक्के परतावा मिळतो, तर गृहकर्ज सुमारे 9 टक्के व्याजदर देते, तर घर खरेदीसाठी वित्तपुरवठा करणे हा अधिक योग्य निर्णय असू शकतो. पण, जर गुंतवणुकीचा परतावा कमी असेल आणि कर्जाचा व्याजदर जास्त असेल, तर पूर्ण परतफेड करत रोखीने घर खरेही करणे हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.

 

गृहकर्जाचा फायदा आणि नुकसान

 

फायदे

गृहकर्ज घेताना बँक किंवा वित्त कंपनीकडून सर्व मालमत्तेची कागदपत्रे पूर्णपणे पडताळली जातात. यामुळे मालमत्ता कायदेशीररित्या सुरक्षित आहे आणि वाद किंवा फसवणूक होण्याची शक्यता टळते. गृहकर्ज घेतल्याने आयकर कायद्याच्या कलम 24 आणि 80 सी अंतर्गत व्याज आणि मुद्दल रकमेवर कर सूट देखील मिळते. यामुळे एकूण कराचा भार कमी होतो. शिवाय, वेळेवर ईएमआय भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक पर्याय वाढतात. कर्ज घेतल्याने तुमच्याकडे असलेली बचत तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतात.

 

नुकसान

गृहकर्ज ही दीर्घकालीन जबाबदारी असते. कर्जावरील व्याजामुळे मालमत्तेच्या किंमती पेक्षा अधिकचे पैसे आपल्याला व्याजाच्या स्वरुपात मोजावे लागते. जर ईएमआय वेळेवर भरला नाही तर बँक मालमत्ता जप्त करू शकते. शिवाय, कर्ज मंजूरी अयशस्वी होण्याचा धोका असतो.

 

रोखीने घर खरेदी करण्याचा फायदा आणि नुकसान

 

फायदे

तुम्ही केलेल्या बचतीतून रोखीने घर खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणतेही व्याज द्यावे लागत नाही. दीर्घकाळात, कर्जावरील व्याज कधीकधी घराच्या वास्तविक किमतीपेक्षा जास्त असू शकते. दुसरीकडे, रोखीने पैसे भरल्याने संपूर्ण प्रक्रिया वेगवान होते, बँकेच्या मंजुरीची वाट पाहण्याची गरज दूर होते आणि व्यवहार लवकर पूर्ण होतो. शिवाय, ईएमआयची चिंता दूर होते. आवश्यक असल्यास असे खरेदीदार बँकेच्या परवानगीशिवाय मालमत्ता विकू शकतात.

 

नुकसान

रोखीने घर घेतल्याने तुमची सर्व बचत एकाच मालमत्तेत गुंतवल्याने तुमची आर्थिक सुरक्षितता कमकुवत होऊ शकते. आणीबाणीच्या परिस्थितीत रोख रकमेची कमतरता जाणवू शकते. रोख पैसे इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवल्याने गृहकर्जाच्या व्याजापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. तसेच, रोखीने घर खरेदी केल्याने आयकरात सूट मिळत नाही.

म्हणून, रोखीने घर खरेदी करणे किंवा गृहकर्ज घेणे यातील निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक परिस्थिती, उत्पन्न, बचत आणि भविष्यातील योजनांवर अवलंबून असतो.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment