होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अंजनसोडेकरांना मोठा दिलासा! आता गावातच मिळणार ‘महसूल सेवा’

On: February 12, 2026 5:12 PM
Follow Us:
---Advertisement---

वरणगाव, ता. भुसावळ : अंजनसोडे येथील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी तहसील कार्यालयात वारंवार जावे लागत होते. यामुळे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार निता लबडे यांनी गावातच आठवड्यातून एक दिवस महसूल सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

दि. २८ जानेवारी रोजी अंजनसोडे रहिवासी गोकुळ बाबुराव चौधरी व अतुल धनराज चौधरी यांनी तहसील कार्यालयात लेखी निवेदन सादर करून याबाबत मागणी केली होती. याची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी प्रियंका चौधरी यांना आठवड्यातून प्रत्येक बुधवारी अंजनसोडे येथे उपस्थित राहून नागरिकांना शासकीय कामकाजाची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

प्रलंबित कामे पूर्ण करण्याचेही आदेश

यामुळे नागरिकांना शासकीय दाखले, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी तसेच इतर महसूलविषयक कामांसाठी गावाबाहेर जावे लागणार नाही. बुधवारी सुटी असल्यास पुढील कार्यदिवशी गावात उपस्थित राहून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचेही आदेश दिले आहेत.

अंजनसोडे गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे स्वागत केले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना आता महसूलविषयक कामांसाठी मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे गावातील शासकीय सेवा अधिक सुलभ व प्रभावी होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

(भुसावळ विभागातील बातम्या तसेच जाहिरातींसाठी संतोष माळी- मो. क्रं. 9673151726, 8830123557 यांच्याशी साधावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment