होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Chopda News: ..अखेर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ‘ते’ दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

On: February 18, 2026 3:20 PM
Follow Us:
---Advertisement---

Chopda News: कर्तव्यावर असताना एकमेकांना मारहाण केल्या प्रकरणातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन्ही हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी कार्यलयीन नियमांना केराची टोपली दाखवित एकमेकांना फ्री स्टाईल हाणामारी केली होती. त्यामुळे दोघांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या हाणामारीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

याबाबत माहिती अशी की, शशिकांत पारधी आणि राकेश पाटील हे दोघे मागील पाच ते सह वर्षांपासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. ड्युटी वाटप, हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.  या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या हाणामारीची जिल्हाभरात चर्चा होती.

त्यामुसार, या प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेत दोन्ही हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित केले आहे. भारतीय न्याय संहिता कलम 194(2) प्रमाणे या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी प्रसार माध्यमांना दिली.

महिनाभरात तिघे निलंबित

एका महिन्याचा आत चोपडा तालुक्यातील लक्ष्मण शिंगाणे (शहर पोलीस ), राकेश पाटील ,शशिकांत पारधी (दोन्ही ग्रामीण पोलीस) असे तिन्ही हेड कॉन्स्टेबल यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे सपूर्ण जिल्ह्यात खडबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

अमळनेर तालुक्यात भूजलपातळी घटली! पाडळसरे परिसरातील तापी, बोरी, पांझरा पट्ट्यात केळी, पपईला बसला फटका

Leave a Comment