होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Monsoon Rain El NINO: राज्यात यंदा कमी पाऊस, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

On: May 29, 2026 1:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Monsoon Rain El NINO: यंदा मान्सूनच्या काळात देशात एल निनोचा प्रभाव राहील. यामुळे देशातील सरासरी पर्जन्यमान कमी राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवले आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला. यापूर्वी एप्रिल महिन्यात हवामान खात्याने संपूर्ण देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता यामध्ये सुधारणा करुन हवामान विभागाने देशात 90 टक्के पावसाचा (Monsoon) अंदाज वर्तवला आहे.

यंदाच्या मान्सूवर एल निनोचे सावट आहे. भारतीय हवामान विभागाने यापूर्वी दिलेल्या आपल्या पावसाच्या अंदाज घट केली आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहील. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एल निनोचा प्रभाव सर्वसाधारण आणि सप्टेंबर महिन्यात तो सर्वाधिक असेल. याचा विपरीत परिणाम मान्सूनसवर होईल, असे के.एस. होसाळीकर यांनी सांगितले.

चार महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती, पिण्याचे पाणी, ऊर्जा आणि आरोग्य अशा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होईल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असेल. पुढील वर्षभरात याचे प्रतिकूल परिणाम जाणवतील. याशिवाय, जून महिन्यात काही भागात उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. जून महिना हा पावसाच्या संक्रमणाचा महिना आहे. 1 जूनला पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधार 40 ते 45 दिवसांत राजस्थानपर्यंत पोहोचतो. मात्र, मान्सूनला उत्तरेकडे सरकायला उशीर झाला तर काही ठिकाणी उष्णतेचा प्रभाव जाणवतो, असे के.एस. होसाळीकर यांनी म्हटले.

तर हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यताही 60 टक्के इतकी वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या निकषांनुसार 90 टक्के पाऊस हादेखील कमी मानला जातो. यंदा पावसाचे प्रमाण त्यापेक्षा कमी राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात पावसाचे प्रमाण सरासरीच्या खाली राहण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात एल निनो फारसा सक्रिय नसला तरी जुलै-ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव वाढत जाईल, असेही हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

MSRTC Student Pass : एसटीचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांचा बस प्रवास होणार डिजिटल; आता कागदी पास ऐवजी मिळणार NCMC स्मार्ट कार्ड

सायबर आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी तांत्रिकदृष्टया सक्षम होण्याची गरज: पो. महासंचालक सदानंद दाते

नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणाचे मलेशिया कनेक्शन?, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

पुणे विषारी दारू प्रकरणाचे पडसाद: राज्यातील ९८८ मिथेनॉल परवानेधारकांची झाडाझडती; तुकाराम मुंढे यांनी काय आदेश दिले ‘ते’ जाणून घ्या

राज्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी; कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

नीट पेपरफुटीवर शरद पवारांचे मोठे विधान, या घोटाळ्याबाबत काय म्हणाले ‘ते’

Leave a Comment