होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणाचे मलेशिया कनेक्शन?, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

On: June 9, 2026 12:32 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून मलेशियातील टीसीएसचा थेट संबंध असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी सोमवारी केला. नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन निरुपम यांनी मलेशियात बसलेला फरार आरोपी इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक व ‘एमआयएम’च्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पॉश कायद्याची (POSH) अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याबद्दल ‘टीसीएस’वर कारवाई होणे आवश्यक आहे, असे निरुपम यांनी सांगितले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निरुपम म्हणाले की, ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रांमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला सोशल मीडियावरील झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून तिचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आरोपींकडून सातत्याने करण्यात आला. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा खान, दानिश शेख, तौफिक अत्तार हे तिघेच सूत्रधार नाहीत तर त्यांच्या पाठीशी मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.

दानिश आणि तौफिक हे पिडितेला मलेशियाला पाठवणार होते, असेही आरोपत्रात म्हटले आहे. त्यामुळे आरोपींचे मलेशियाशी थेट संबंध होते, हे स्पष्ट दिसतंय असे निरुपम म्हणाले. याच मलेशियात फरार आरोपी झाकीर नाईक लपून बसला आहे. या झाकिर नाईकची संस्था किंवा एजन्सी महाराष्ट्रात कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या हिंदु मुलींना धर्मांतरासाठी टार्गेट करत आहेत का, याबाबत तपास यंत्रणांनी चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी केली.

निरुपम पुढे म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी निदा खान ४० दिवस फरार होती. पोलीसांच्या शोध मोहीमेत ती छत्रपती संभाजी नगरमधील ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरी कुटुबांसह सापडली. यात निदा खान आणि नगरसेवक मतीन पटेल यांना पोलीसांनी अटक केली. पोलीस चौकशीत मतीन पटेल याने वारंवार इम्तियाज जलीलचे नाव घेतले होते. जलील हे एमआयएमचे महाराष्ट्राचे प्रमुख आणि माजी खासदार आहेत. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभागात निवडून आलेली ‘एमआयएम’ची नगरसेविका मुंब्र्याला हिरवे करणार असा दावा करते. यावेळी तिच्या सोबत असलेले इम्तियाज जलील तिथं केवळ मुंब्राच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार असे, जाहीर वक्तव्य करुन वाद निर्माण करतात. त्यामुळे टीसीएस प्रकरणात ‘एमआयएम’चा सहभाग असू शकतो, असा आरोप निरुपम यांनी यावेळी केला. तपास यंत्रणांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.

संपूर्ण प्रकरण ज्या कंपनीत घडले त्या टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीवर पॉश कायद्याची (POSH) काटेकोर अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

 

महाराष्ट्रातील बड्या कॉर्पोरेट्सची चौकशी करावी

नाशिकमधील टीसीएस प्रकरणाची राज्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आयटी, फार्मा आणि मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी सुरक्षितरित्या काम करत आहेत का, याबाबत पोलीस आणि राज्य सरकारने चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सायबर आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी तांत्रिकदृष्टया सक्षम होण्याची गरज: पो. महासंचालक सदानंद दाते

पुणे विषारी दारू प्रकरणाचे पडसाद: राज्यातील ९८८ मिथेनॉल परवानेधारकांची झाडाझडती; तुकाराम मुंढे यांनी काय आदेश दिले ‘ते’ जाणून घ्या

राज्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी; कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

नीट पेपरफुटीवर शरद पवारांचे मोठे विधान, या घोटाळ्याबाबत काय म्हणाले ‘ते’

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाची स्थिती कशी ‘ते’ जाणून घ्या

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज कसा राहील ‘ते’ जाणून घ्या

Leave a Comment