होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

On: August 4, 2026 4:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (4 ऑगस्ट) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. विधी व न्याय विभाग, कृषि, सामान्य प्रशासन आदी विभागांचे निर्णय घेण्यात आले.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार असून त्यासाठी आवश्यक पदनिर्मितीस, खर्चाच्या तरतुदीस मान्यता (विधि व न्याय विभाग) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. आता योजनेत भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश होणार. महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्यामुळे दिलासा मिळणार आहे. (कृषी विभाग)

मुंबई शहरातील सर्व शासकीय कार्यालयांची व मुंबई महानगरपालिकांची वीज देयके बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमच्या (बेस्ट उपक्रम) संयुक्त बिलिंग प्रणालीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने अदा केली जाणार. त्यासाठी प्रशासकीय सुधारणेस मान्यता देण्यात आली (ऊर्जा विभाग)
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्त यांची आणखी तीन नवीन पदे. या पदांसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. (सामान्य प्रशासन विभाग)

सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, तसेच सरकारी वकील कार्यालय होणार असून त्यानुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारीवृंद यांची पदे मंजूर व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीस मान्यता दिली. (विधि व न्याय विभाग)

केज (जि. बीड) येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांची पदे व त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय विभाग)

पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे विशेष मोटार वाहन न्यायालय होणार. (विधि व न्याय विभाग)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुर्दैवी घटना: गरबा खेळण्यासाठी आश्रमशाळेतून पाच विद्यार्थी पळाले अन् रस्ता अपघातात जीव गमावला

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

Leave a Comment