भुसावळ : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्र. ०२१८७ रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी १५ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे.
तसेच गाडी क्र. ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-रिवा साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १६ जानेवारी ते २७फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चालविण्यात येणार आहे.
या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये तसेच डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही गाडी पूर्वीप्रमाणेच नियोजित वेळेनुसार धावणार आहे.
या ट्रेनची सेवा नवीन वर्षात संपणार होती. परंतु, ती १ जानेवारी ते ८ जानेवारी २०२६ पर्यंत दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आली होती. आता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तिची सेवा आणखी सात आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.







