होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Coca-Cola project in Jamner : जामनेरला दावोसचा सुवर्णयोग! कोका-कोलाच्या प्रकल्पाला हिरवा कंदील

On: January 24, 2026 7:40 AM
Follow Us:
---Advertisement---

Coca-Cola project in Jamner : दावोसमधील गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आक्रमक आणि प्रभावी प्रयत्नांचे फळ म्हणून जळगावचा जामनेर तालुका औद्योगिक नकाशावर झळकणार आहे. जागतिक स्तरावरील प्रसिद्ध शीतपेय कंपनी कोका-कोलाने जामनेरमध्ये भव्य प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय जामनेरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

दावोसमधील गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांच्या प्रमुखांशी संवाद साधत महाराष्ट्रातील उद्योगस्नेही धोरणे, मजबूत पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि गुंतवणीसाठी उपलब्ध असलेल्या व्यापक संधींचे प्रभावी सादरीकरण केले. याच ड्रामायन त्यांनी कोका-कोला कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गोल्डझमन यांची भेट घेऊन जामनेर प्रस्तावित प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करून अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले.

जामनेर येणार औद्योगिक विकासाच्या केंद्रस्थानी

या नव्या गुंतवणीमुळे नाशिक विभागात एकूण ७ लाख ३० हजार १०० रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातील एक अत्यंत महत्वाचा आणि चर्चेचा प्रकल्प ‘कोका-कोला’ जामनेरमध्ये साकारला जाणार आहे. यामुळे जामनेर राज्याच्या औद्योगिक विकासाच्या केंद्रस्थानी येणार आहे.

ऐतिहासिक दिवस – मंत्री महाजन

कोका-कोला सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीचा प्रकल्प जामनेरमध्ये येणे ही तालुका आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, स्थानिक तरुणांना हक्काचा रोजगार मिळणार आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

कोका-कोला प्रकल्प जामनेरसाठी सुवर्णसंधी

कोका-कोला प्रकल्पामुळे जामनेरच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. अर्थात वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, सेवा उद्योग यासारख्या पूरक क्षेत्रांनाही मोठी चालना मिळेल. तसेच रस्ते वीज पाणीपुरवठा दळणवळण आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होईल. याचा लाभ स्थानिक नागरिक, शेतकरी आणि लघुउद्योजकांना मिळणार आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यासाठी हा प्रकल्प सुवर्णसंधी ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

अमळनेर तालुक्यात भूजलपातळी घटली! पाडळसरे परिसरातील तापी, बोरी, पांझरा पट्ट्यात केळी, पपईला बसला फटका

Leave a Comment