होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

E-bus service in Jalgaon : ई-बससेवेला मुहूर्त सापडेना; जळगाकरांना आणखी चार महिने करावी लागणार प्रतीक्षा

On: January 25, 2026 5:21 AM
Follow Us:
---Advertisement---

E-bus service in Jalgaon : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई-बस सेवा योजना अंतर्गत जळगाव शहरात ई-बस सेवा मंजूर झालेली आहे. मात्र अपूर्ण काम, पावसामुळे काँक्रीटीकरण कामाला उशीर, तसेच अन्य तांत्रिक कामांमुळे या सेवेचे काम रेंगाळत्याने अजून चार महिने या सेवेला सुरू होण्यास वेळ लागणार असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आणखी चार महिने जळगाकरांना ई-बसची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शहरातील सार्वजनीक वाहतुक सेवा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई-बस सेवा योजने अंतर्गत मंजूर झाली असून महापालिकेच्या माध्यमातून ही सेवा शहरात राबवली जाणार आहे. यासाठी जळगाव शहरातील महापालिकेच्या मेहरुण तलाव जवळील छत्रपती शिवाजी महाराज उद्याना जवळील २ एकर जागेत हे डेपो तयार केले जाणार आहे. यात ५० ई-बस थांबतील ऐवढी जागा, चार्जंग स्टेशन व एक विद्युत उपकेंद्र आदी सुविधा येथे असणार आहे.

बससेवेला मुहूर्त सापडेना

शहरातील नागरिकांसाठी सुरू होणारी ई-बस सेवा १५ ऑगस्ट २०२५ ला सुरू होईल असे बोलले जात होते. परंतू अपूर्ण काम, पावसामुळे काँक्रीटीकरण कामाला उशीर, तसेच अन्य तांत्रिक कामांमुळे या सेवेचे काम रेंगाळत्याने अजून चार महिने या सेवेला सुरू होण्यास वेळ लागणार असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जळगावकरांनी या वातानुकूलीत ई-बसमधून प्रवास करण्याचे बघितलेले स्वप्न उन्हाळ्यात केव्हा पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment