Health Tips : तोंडाला अल्सर होणे ही एक सामान्य पण अत्यंत वेदनादायक समस्या आहे. गालांच्या आत, जिभेवर, हिरड्यांवर वा ओठांच्या आत होणाऱ्या या लहान जखमा खाणे, पिणे आणि बोलणेही कठीण करतात. अनेकदा हे फोड काही दिवसांत आपोआप बरे होतात, पण वारंवार अल्सर होत असतील तर ते गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे ईएनटी तज्ज्ञ वा दंतचिकित्सकांचा सल्ला जरूर घ्या.
अल्सर होण्याची मुख्य करणे
- शरीरात व्हिटॅमिन B12, फॉलिक ऍसिड आणि लोहाची कमतरता.
- जास्त तिखट, आंबट, तेलकट व गरम पदार्थांचे सेवन.
- पोट बिघडणे, आम्लपित्त, बद्धकोष्ठता.
- चुकून गाल चावला जाणे वा दात/ब्रशमुळे झालेली जखम.
- मानसिक तणाव, चिंता आणि अपुरी झोप.
- महिलांध्ये हार्मोनल बदल (विशेषतः मासिक पाळीच्या काळात)
- काही औषधांचे दुष्परिणाम.
- धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान
वारंवार अल्सर येत असतील तर सावध व्हा!
- जर तुम्हाला दर काही दिवसांनी अल्सर येत असतील.
- फोड बरे होऊन पुन्हा पुन्हा होत असतील.
- अल्सरसोबत तोंडातून रक्त येत असेल.
- वजन कमी होत असेल.
- एखादा फोड १०-१५ दिवसांतही बरा होत नसेल.
- तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
कोणाला जास्त धोका?
- धूम्रपान करणारे व तंबाखू वापरणारे.
- मधुमेहाचे रुग्ण.
- व्हिटॅमिन B12 ची कमतरता असलेले.
- ज्यांचे पोट वारंवार बिघडते.
- जास्त मसालेदार अन्न खाणारे.
अल्सरपासून बचाव कसा कराल?
- व्हिटॅमिन B12, लोह यांची तपासणी करून घ्या.
- तंबाखू व धूम्रपान टाळा.
- मसालेदार पदार्थ कमी करा.
- तोंडाची स्वच्छता नीट ठेवा.
- तणावमुक्त जीवशैली स्वीकारा.
( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )











