होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Sunetra Pawar Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री, उद्या घेणार शपथ!

On: January 30, 2026 7:38 PM
Follow Us:
---Advertisement---

Sunetra Pawar Deputy Chief Minister : अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादक शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून, त्या उद्या शनिवारी (दि. ३१ जानेवारी) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

याबाबत पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली होती. अखेर उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

या संदर्भात अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली, त्यांनी  उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे.

उद्या शनिवारी (दि. ३१ जानेवारी) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. विशेषतः यामुळे  महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.

नेते वर्षा निवासस्थानी दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment