होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वरणगावात एकता दिव्यांग संस्थेतर्फे दिव्यांग व नागरिकांना ई-श्रम व आयुष्मान कार्ड वितरण; 300 हून अधिक लाभार्थ्यांनी घेतला लाभ 

On: February 11, 2026 10:03 AM
Follow Us:
---Advertisement---

वरणगाव : येथील एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सुमारे ३०० दिव्यांग बांधवांसह नागरिकांना ई-श्रम कार्ड व आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

एन.एम.पी. पुणे, टाटा ए.आय.जी. आणि स्वस्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोफत कार्ड काढून देण्यात आले. या उपक्रमाचा दिव्यांगांसह सुमारे ३०० ते ४०० नागरिकांनी लाभ घेतला.

दरम्यान, दिव्यांग साहित्य वाटपाचा कार्यक्रम नियोजित होता. मात्र मुंबई येथील मान्यवर काही कारणास्तव उपस्थित राहू न शकल्यामुळे संस्थेने साहित्य वाटप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

या कार्यक्रमासाठी एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्था, वरणगावचे अध्यक्ष सुनील शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली रफीक शेख सांडू, विजय चौधरी, सुखराम माळी, रेहमान शाह, सुनील पाटील, संतोष पाटील, रामा शिवरामे, बालू सैतवाल, आर्यन परदेशी, संतोष देशमुख, अनिल इंगळे, आनंदा झांबरे, अविनाश पाटील, नमन माळी, दर्शन माळी, विद्या सोनार, सुजाता भोई, योगिता खडसे आणि साधना जांभुरे यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment