होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

On: April 4, 2026 6:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News : राज्यासह देशभर गाजणाऱ्या अशोक खरात प्रकरणात रोज वेगेवगेळे खुलासे होत आहे. या प्रकरणात राजकारण्यासह अधिकारी ही गोत्यात आले आहे. राज्यातील काही महसूल अधिकारी खरातला मदत करत असल्याचे समोर आले आहे. काहींचे आर्थिक लागेबांधे ही समोर आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली. खरातचा सीडीआर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे, अशात काही अधिकाऱ्यांचे कॉल रिकॉर्ड असण्याची शक्यता व्यक्त होता असतांना, खरातला मदत करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच दिला होता. आता खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यानी पुन्हा इशारा देतांना, जे अधिकारी खरातला मदत करत आहेत, अशा अधिकाऱ्यांना थेट बडतर्फे करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

खरात प्रकरणामुळे नाशिकच्या संस्कृतीला काळिमा फसण्याचा काम केले आहे, त्या संबंधित लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला. आमच्या अधिकाऱ्यांनी जर मदत केली असेल, तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल, त्यांनी असे स्पष्ट केले. तसेच एसआयटीच्या टीमकडून आमच्याकडे नावे आल्यावर त्यांना नोकरीवर ठेवणार नसून त्यांना त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कोणालाच सोडले जाणार नाही. जी नावे एसआयटीच्या माध्यमातून समोर येतील त्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे, तसेच एक महसूल अधिकारी खरातच्या मालमत्तेमध्ये भागीदार असल्याचे समोर आल्याचे समजते. अशा मदत करणाऱ्या अधिकाऱ्याला ही बडतर्फे केले जाणार आहे, खरातच्या कार्यालया बाहेरील सीसीटीव्ही तपासून कारवाई केली जाईल, त्यातील कोणालाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सीडीआर बाहेर आल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, ठाकरे सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी ही दमानिया यांच्याकडे सीडीआर कुठून आला असा सवाल केला आहे. याबाबत बावनकुळे यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार संवेदनशील आहे, राज्य सरकार याची माहिती देणार नाही, अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी एसआयटीला द्यावी असे स्पष्ट केले.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment