America- Israel vs Iran War: अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यात दोन आठवड्याचा युद्धविराम झाला आहे. मात्र या समझोत्यामध्ये लेबनॉनचा समावेश नसल्याने इस्रायल आणि इराणमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरीका- इस्रायल आणि इराण मधील युद्धबंदीच्या करारवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन आठोवड्यांचा युद्ध विराम झाला आहे. त्यात लेबनॉनचा संबंध नसून इस्रायलने लेबनानवर हल्ले सुरूच ठेवले, युद्धविराम झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्रायलचे १० मिनिटात १०० हवाई हल्ले केले आहे. त्यात मोठी वित्त आणि जीवित हानी झाली आहे, शेकडो नागरिक(civilian) मारले गेले असल्याचे लेबनीज आरोग्य मंत्र्यांच्या हवाल्याने माध्यमांनी वृत्त दिले आहे.
दरम्यान या युद्ध विरामात लेबनानचा सहभाग आहे. त्यामुळे इस्रायलने लेबनानवरील हल्ले थांबवावे, असे इराणने स्पस्ट केले असून अन्यथा युद्ध विराम फेटाळून लावू असा इशारा दिला आहे. तसेच या हवाई हल्ल्यात २५४ लोक मारले गेल्याचे लेबनानच्या नागरी संरक्षण विभागाने सांगितले. त्यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणचे परराष्ट्रीय मंत्री अब्बास अरागची (Abbas Aragachi)यांनी पाकिस्तानला फोन वरून विचारांना केली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या समझोत्यात लेबनानचा समावेश नसल्याचे सांगितले.
दरम्यान इस्रायल आणि लेबनॉनची ती स्वतंत्र झडप आल्याचं सांगून इस्रायलचा बचाव अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी केला आहे. तर इस्रायलचा विरोध करत तेल अविववर इराणने मिसाईल हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणाव वाढला आहे. त्यामुळे इराणने चर्चेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. परराष्ट्रीय मंत्री अरागची यांनी अमेरिका इस्रायलच्या माध्यमातून हे युद्ध सुरू ठेवू इच्छिते का? असा सवाल केला आहे. तर अमेरिकन प्रवक्त्या कॅरोलिन लेविट (Karoline Leavitt) यांनी इस्रायल आमचा सहयोगी असून लेबनान आणि इस्रायल मधील हल्ले हे दोघांमधील झडप असल्याचे सांगितले. मात्र इराण हल्ल्याची मोठी रणनीती आखत आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.








