होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Indian Railway: उधना ते मालदा टाउन आणि एलटीटीई- हावडा साप्ताहिक विशेष गाड्या 

On: April 10, 2026 7:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Indian Railway: रेल्वे उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी उधना ते मालदा टाउन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात येणार आहेत. उन्हाळी सुटयांमुळे सध्या रेल्वे प्रवाश्यांची गर्दी वाढत आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त विशेष गाड्या रेल्वेतर्फे चालवल्या जाणार आहे. त्यामुळे प्रवाश्याना गर्दीच्या वेळी रेल्वेची या अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे.

उधना ते मालदा टाउन साप्ताहिक विशेष गाडी (३२ सेवा) ट्रेन क्रमांक ०९०३३ साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०९ एप्रिल २०२६ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत उधना येथून दर गुरुवारी २३.०० वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (१६ सेवा) ट्रेन क्रमांक ०९०३४ साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १२.एप्रिल २०२६ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत मालदा टाउन येथून दर रविवारी ०९.३० वाजता सुटेल आणि उधना येथे तिसऱ्या दिवशी ०१.२० वाजता पोहोचेल. (१६ सेवा) थांबे -: नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, किऊल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बडहरवा आणि न्यू फरक्का या स्थानकांचा समावेश आहे. संरचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅन.

२) लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा विशेष गाडी (२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०११४५ विशेष गाडी दिनांक १४.एप्रिल.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २०.१५ वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा) ट्रेन क्रमांक ०११४६ विशेष गाडी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी हावडा येथून १४.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. (१ सेवा) थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खरगपूर आणि सांतरागाछी. संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय, ९ वातानुकूलित तृतीय, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी डब्यांची स्थिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment