Jalgaon News: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने आज जळगाव शहरात रेल्वे स्टेशन येथील परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला बहुजन व्हॉलंटियर फोर्सतर्फे बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पथसंचलनाद्वारे मानवंदना दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी पथसंचलनाची सुरुवात बिग बाजार, खांदेश मॉल जळगाव येथून खान्देश प्रभारी बी.व्ही.एफ. सुनिल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झाली, सकाळी ९ वाजता सुरु झालेली.ही रॅली गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरु पुतळ्यामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय सेन संघाचे राष्ट्रीय सचिव राजकुमार गवळी, सुवर्णकार समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, टोकरे कोळी समाजाचे अशोक शिरसाटे, मुस्लिम बिरादरीचे शैफुल्लाभाई खान, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाचे देवराज वाडे, राष्ट्रीय पेन्शनर संघाचे दिलीप इंगळे, रविंद्र मोरे, देविदास पारधे व राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघाच्या सखुबाई जाधव,शोभाताई भालेराव ,प्रा.मिनाक्षी वाघमारे,बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या रॅलीचे संचलन प्रामुख्याने बीव्हीएफचे राज्य प्रभारी प्रकाश इंगळे, राज्य सहसंयोजक बहुजन क्रांती मोर्चा सुमित्र अहिरे जवान शुध्दोधन खंडारे,जवान गोविंदा इंगळे,जवान संजीव सोनवणे, जवान माया खंदारे, जवान उज्ज्वला इंगळे, जवान देवानंद निकम, सुनिल देहाडे, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, बबलु पेंढारकर यांनी केले. या पथसंचलनात जळगाव शहरातील बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्ते सहभागी होते. दरम्यान शहर परिसरात आंबेडकर जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण होते. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या उपदेशाचे स्मरण करण्यात आले.
कानळदा परिसरात केक कापून जयंतीउत्सव उत्साहात
त्रिभुवन कॉलनी, केसी पार्क, श्रीकृष्णनगर, महादेवनगर कानळदा परिसरातील नागरिकांनी रात्री १२ वाजता अल्फा पेट्रोलपंपाजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त केक कापून जल्लोष करण्यात आला. कानळदा परिसर उत्सव समितेचे अध्यक्ष मधुकर अहिरे,आयु. सुरवाडे, सुनील देहडे, जे डी भालेराव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.








