होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

होर्मूझ सामुद्रधुनीची कोंडी फोडण्यासाठी १२ देश एकत्र; बैठकीसाठी फ्रांस-ब्रिटनचा पुढाकार..!

On: April 17, 2026 12:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Amerca-Israel vs Iran War: अमेरिका- इस्रायल आणि इराण युद्धाला दीड महिन्याच्यावर झाले आहे. होर्मूझ सामुद्रधुनीतून तेल आणि व्यापारी जहाजांची वाहतूक बंद असल्याने त्याचा फटका हळूहळू युरोप आणि आशियाला बसत आहे, होर्मूझची कोंडी फोडण्यासाठी फ्रान्स आणि युनाइटेड किंग्डम यानी पुढाकार घेतला आहे, अमेरिका वगळता डझभर देशांना एकत्रित करून यावर तोडगा काढण्यासाठी पॅरिसमध्ये एक बैठक आज होणार आहे, असे वृत्त असोशिएटेड प्रेसने दिले आहे.यापूर्वी ब्रिटनने चर्चा करण्यासाठी ५० देशांना बोलावले होते. (Amerca-Israel vs Iran War)

अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे होर्मूझ सामुद्रधुनी बंद आहे. हा मार्ग यूरोप, आशियासह जगासाठी तेल आणि व्यापाराकरिता महत्त्वाचा आहे. त्यामुळे यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमेर यांनी एका बैठक घेतली होती, आता फ्रांस आणि ब्रिटन यांच्या प्रयत्नातून पॅरिस येथे महत्त्वाची बैठक शुक्रवारी होईल. त्यामध्ये अमेरिका वगळता इतर बारा देशांचा समावेश आहे. युद्धाचा प्रभाव कमी करण्यासाठी या बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. होर्मूझच्या तिढा कायम असल्याने जागतिक अर्थव्यवसंस्थेला त्याचा मोठा फटका बसत आहे. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, इराणने ही अरुंद सामुद्रधुनी बंद केली, या मार्गावरून जगातील एक पंचमांश तेल वाहतूक होते. टी ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Amerca-Israel vs Iran War)

‘होर्मुझ सामुद्रधुनी सागरी स्वातंत्र्य नौकानयन उपक्रम’ (Strait of Hormuz Maritime Freedom of Navigation Initiative) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेच्या नियोजनात अमेरिका सहभागी नाही. शुक्रवारच्या परिषदेपूर्वी ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्याची ही मोहीम “पूर्णपणे बचावात्मक” असेल, ती केवळ युद्धात सामील नसलेल्या देशांपुरती मर्यादित असेल आणि “जेव्हा सुरक्षेची परिस्थिती अनुकूल असेल” तेव्हा तैनात केली जाईल. असे स्पष्ट केले (Amerca-Israel vs Iran War)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment