Weather Update: सध्या उन्हाळयाच्या सुट्ट्या सुरू आहे, त्यामुळे सुट्टीत पर्यटक फिरायला प्राधान्य देत आहे, विशेषतः उन्हाळयात थंड हवेच्या ठिकाणी फिरणे पसंत करतात, सध्या राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान चाळीशी गाठत असतांना दुसरीकडे राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटकांना राईट चॉईस ठरत आहे. येथील पारा आणखी घसरला आहे. (Mahabaleshwar) आज महाबळेश्वरचे तापमान ३२.१ अंश होते, तर सोमवारी तापमान ३२.८ अंश नोंदवले गेले, त्यामुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना साजेशे वातावरण आहे. हवेत गारवा असल्याने पर्यटक या ठिकाणाला पसंती देत आहेत.(Letest Weather News)
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान असे आहे, कोंकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही दठकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विदर्भात तापमान किंचित उतरले आहे. आता अमरावती तापले पारा ४३.४ अंशावर पोहचला आहे, तर जळगाव ४१.८ इतके तापमान नोंदवले गेले आहे. (Mahabaleshwar)
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सियस)
मुंबई (कुलाबा) ३३.७,
सांताक्रूझ ३४.९,
अचलबाग ३३.७,
रत्नाचगरी ३४.२,
पणजी (गोवा) ३५.६,
डहाणू ३३.३,
पुणे ३९.७,
लोहगाव ४०.८,
अहिल्यानगर -,
जळगाव ४१.८,
कोल्हापूर ३७.१,
महाबळेश्वर ३२.१,
मालेगाव ४१.०,
नाशिक ३९.३,
सांगली ४०.६,
सातारा -,
सोलापूर ४०.०,
धाराशिव ३९.१,
छत्रपती संभाजीनगर ४१.५,
परभणी ४१.०,
नांदेड -, बीड ४१.०,
अकोला ४३.२,
अमरावती ४३.४,
बुलढाणा ४०.५,
ब्रह्मपुरी ४१.९,
चंद्रपूर ४१.६,
गोंदिया ४२.०,
नागपूर ४२.४,
वाशीम ४१.६,
वधाज ४२.५,
यवतमाळ ४१.८.







