Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातचे एक मागून एक कारनामे उघड होत आहे. दैवीशक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या भोंदूचे आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे, अशोक खरात याने ‘सीए’ची फसवणूक केली. खरात याने पूजा विधीच्या नावाखाली ८ कोटी ७६ लाखांची फसवणूक केल्याचं उघड झाले आहे, खरातची सगळी गुपिते चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितल्याने खरातचा पाय आणखी खोलात रुतला आहे .आतापर्यंत १२ गुन्हे त्याच्यावर दाखल आहे, सहाव्या गुन्ह्यात त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक खरात हा खोटे सांगून फसवायचा आणि मृत्यू योग, गंडांतर योग अवतार पूजा अशा पूजा विधीच्या नावाखाली हातचलाखी करून त्याने जुलै २०१७ ते ऑगस्ट २०२४ पर्यंत झी ८ कोटी ७६ लाख ५ हजार ५६० रुपये रक्कम खंडणीच्या स्वरूपात वसूल केली, अशी माहिती संबंधित सीएसने पोलिसांना दिली, दरम्यान खरातचा संशय आल्यामुळे या सीएने अशोक खरात याच्या फार्महाऊसवर स्वयंपाक करणाऱ्या एका व्यक्तीला हेर म्हणून पाठवले होते. या हेराने अशोक खरातबाबत बरीच धक्कादायक माहिती उघड केली. ही माहिती सीएने एसआआयटी पथकाला दिली.
एका बँकेच्या अधिकाऱ्याची आणि माझी मैत्री कामानिमित्त झाली, त्यातून अशोक खरातची ओळख झाली, आईवडिलांची मृत्यूची भीती घालून मृत्यू योग टाळण्यासाठी अवतार पूजा विधीच्या नावाने फसवणूक केली. मी जन्माची कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, अशोक खरातने मला त्याबद्दल सांगितले, ते ऐकून माझा त्याच्यावर विश्वास बसला. मी माझ्या घरी त्याला बोलवले होते, घराच्या बाहेर गप्पा मारत असताना खरातने अचानक मूठ बंद करून उजव्या हातातून काजू कतली काढली आणि मला म्हणाला, हा घ्या प्रसाद, त्यातून मला खरातकडे दिव्यशक्ती असल्याचा विश्वास बसला. खरातने मला सांगितले तुझ्या मित्राला कॅन्सर होईल आणि त्याचा मृत्यू होईल, योगायोगाने तसेच झाले. आणि माझा विश्वास दृढ झाला. त्यानंतर अशोक खरात सांगेल, ती पूर्व दिशा असं मी करू लागलो. त्यानंतर मी पूजेसाठी तयार झालो, त्याने मला सांगितलं की तुम्हाला गंडांतर योग आहे. आई-वडिलांचा मृत्यू आणि व्यवसायात मोठे संकट उभे राहील. हा योग टाळण्यासाठी त्यांनी मला एका धार्मिक संस्थेचा विश्वस्त होण्याची गरज असल्याचे सांगितले. मी शिवानिक ट्रस्टचा विश्वस्त झालो. मी २०१९ मध्ये शिवनिका संस्थांमध्ये मी सदस्य झालो. संस्थेच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला नाही. मात्र, २०२५ मध्ये मी स्वतःहून सदस्य पदाचा राजीनामा दिला.
खरातने मला आईच्या दीर्घायुष्यासाठी अवतार पूजेची वेळ आली आहे आणि ती करावी लागेल असे सांगितले. मीरगाव येथे ही पूजा करायची ठरली आणि तेथून वावी गावाजवळ अशापीर बाबा दर्गात अवतार पूजा सांगून पाच कोटी रुपये घेतले. आईच्या मृत्यूचा योग येईल, असे घाबरून मी लगेच भावाच्या बँक खात्यामधून चार कोटी पंचवीस लाख दिले. दहा दिवसानंतर अशोक खरातने वावी गावाजवळ अशापीर बाबा दर्गात डोंगरावर रात्री पूजा केली. वडिलांसाठी पुन्हा अवतार पूजा करावी लागेल, मी पुन्हा घाबरलो आणि त्याला सांगितले की पूजा करू, त्याने त्रिवेंद्रम येथील समुद्रकिनारी जुलै महिन्यात अवतार पूजा करावी लागेल, त्यासाठी पाच कोटी रुपये इतका खर्च सांगितला. प्रत्येकवेळी मला आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवून कोट्यावधी रुपये घेतले. मला त्याच्या दैवी शक्ती आणि अध्यात्माबाबत संशय आला. त्यामुळे मी हेर नेमुन त्याची माहिती घेतली.
फार्म हाऊसवर एक कुक म्हणून काम करणारा माझा माणूस नेमला, हा अशोक खरातचा अत्यंत विश्वासू म्हणून काम बघत होता, त्यांनी खरातची सर्व अनैतिक कृत्यांबाबत माहिती मला दिली. फार्म हाऊसवर अशोक खरात काही मुली आणि महिला घेऊन येतो, येण्याच्या आधी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायला सांगतो. मुली आणि महिलांसोबत तो दारू पितो आणि नशेत बेडवर लघवी करतो, असे खरातच्या दारूच्या नशेतील सर्व प्रकार कूकने मला सांगितले. मला अशोक खरातच्या विरोधात तक्रार द्यायची होती. मात्र, मार्च महिना असल्याने माझ्यामागे खूप काम होतं आणि मी पोलीस ठाण्यात जाऊ शकलो नाही. माझ्या मित्राचा मृत्यू नैसर्गिक होता, हे मित्राच्या बायकोने मला नंतर सांगितले.






