America Israel And Iran War: होर्मूझ खाडीच्या नाकेबंदीवरून अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कायम आहे, अमेरिकेने इराणची नाकेबंदी केल्याने इराणने अद्याप थेट वाटाघाटी करणे टाळले आहे, आता इराण आपल्या अणुकार्यक्रमावर भाष्य न करता होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली नाकेबंदी संपवण्याचा प्रस्ताव देत आहे, असे या प्रस्तावाची माहिती असलेल्या दोन प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. त्याचवेळी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाला भेट दिली, आणि इस्रायल व अमेरिकेविरुद्धच्या युद्धासंदर्भात मॉस्कोशी चर्चा करण्यासाठी चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान बंद दाराआड झालेल्या वाटाघाटींवर चर्चा करण्यासाठी नाव न सांगण्याच्या अटीवर, दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणला आपल्या प्रस्तावाचा एक भाग म्हणून अमेरिकेने देशावरील नाकेबंदी संपवावी, अशीही इच्छा आहे.
पाकिस्तानने अमेरिकेकडे पाठवलेल्या या नवीन प्रस्तावाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी आणि युद्धविराम कायमस्वरूपी करण्यासाठीच्या एका व्यापक कराराचा भाग म्हणून इराणचा अणुकार्यक्रम संपुष्टात आणण्याची त्यांची इच्छा आहे. अमेरिकेने पाहिल्यापासूनच हा मुद्दा लावून धरलं आहे.
“सर्व पत्ते आमच्या हातात आहेत. जर त्यांना बोलायचे असेल, तर ते आमच्याकडे येऊ शकतात किंवा आम्हाला फोन करू शकतात,” असे ट्रम्प यांनी रविवारी फॉक्स न्यूज चॅनलला सांगितले, असे वृत्त असोशिएटेड प्रेसने दिले आहे.











