होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Railway News: रेल्वेतून पाच लाखाचा एवज चोरणाऱ्यास अटक

On: April 27, 2026 7:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Railway News: राज्यराणी रेल्वेतून प्रवास करणा-या महिलेचे सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरणाऱ्यास नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला. दरम्यान चोरट्याना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले.

छत्रपती संभाजी नगर पोलीस रेल्वे अधीक्षक स्वाती भोर, मनमाडचे उपअधिक्षक वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आरपीएफचे निरीक्षक नविन प्रताप सिंह, पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे, संजय केदारे, सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील, रघुनाथ सानप, आरपीएफचे लक्ष्मण वाघ,सागर वर्मा यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

फिर्यादी ज्योती हनुमंत भारती (रा. ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा – भारती या गेल्या २८ जानेवारीला नांदेड ते ठाणे असा राज्यराणी एक्सप्रेसने एसी कोचमधून प्रवास करीत होत्या. त्यांची पर्स चोरीस गेली. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके व सोन्याची अंगठी, रोकड, सॅमसंग कंपनीचा अल्ट्रा मोबाईल असा एकूण ४ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल होता. पोलिस उपनिरीक्षक केदारे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. संशयित रोहित मारूती दुवेवार (रा. नांदेड) याने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यास नुकतीच अटक करण्यात आली. त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अटक करून पोलिसांनी नांदेड येथे नेले. तेथून भारती यांचे सोन्याचे दागिने, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ४ लाख ८५ हजाराच मुद्देमाल उपनिरीक्षक सोनवणे यांनी जप्त केला. या गुन्ह्यातील सोने हे संशयिताचा मित्र नामदेव आनंदराव मुंडकर (रा. नांदेड) याने विकत घेतल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. नाशिक रोडच्या रेल्वे न्यायालयात संशयितांना हजर करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment