LPG Black Marketing Action: एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात कारवाई सुरु ठेवण्यात आली आहे. कालच्या दिवसात देशभरात २८०० हून अधिक छापे टाकण्यात आले. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (पीएसयुज ओएमसीज) अचानक तपासणी सुरु केली असून कालपर्यंत ३१६ एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर ७२ एलपीजी वितरकांची सेवा स्थगित ठेवण्यात आली आहे.
काल, 46 एलपीजी वितरकांना कारणे दाखवा नोटीसा जारी करण्यात आल्या, ६ वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर एका एलपीजी वितरकाची सेवा स्थगित ठेवण्यात आली. कालच्या दिवशी, देशभरात ५ किलो वजनाचे ८२,००० पेक्षा जास्त एफटीएल सिलेंडर्स विकण्यात आले आहेत.२२० पेक्षा जास्त शिबिरांच्या माध्यमातून ५ किलो वजनाच्या ५४३६ एफटीएल सिलेंडर्सची विक्री झाली.
राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक एलपीजी वितरणाचे नियोजन करण्यासाठी आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या कंपन्यांच्या कार्यकारी संचालकांची एक त्रि-सदस्यीय समिती राज्य सरकारी अधिकारी आणि उद्योग संस्थांशी समन्वय साधत आहे. एप्रिल-२६ या महिन्यात (२७ एप्रिलपर्यंत) एकूण १,७५,२०५ टन (१९ किलो वजनाच्या ९२.२१ हून अधिक एलपीजी सिलेंडर्सच्या समतुल्य) व्यावसायिक एलपीजीची विक्री करण्यात आली आहे.
दि. २७ एप्रिल रोजी ९५७८ टन व्यावसायिक एलपीजीची (१९ किलो वजनाच्या ५.०४ हून अधिक एलपीजी सिलेंडर्सच्या समतुल्य) विक्री झाली.
फेब्रुवारी-२६ या महिन्यात वाहनांसाठीच्या ५ हजार टन एलपीजीची विक्री झाली होती, त्या तुलनेत, एप्रिल-२६ या महिन्यात (२७ एप्रिलपर्यंत), वाहनांसाठीच्या ९५०० टन एलपीजीची विक्री झाली आहे.
एप्रिल-२६ या महिन्यात (२७ एप्रिलपर्यंत), पीएसयुज ओएमसीजद्वारे दर दिवशी सरासरी ३५३ टन वाहनांसाठीच्या एलपीजीची विक्री झाली होती, तर जानेवारी-२६ आणि फेब्रुवारी-२६ या महिन्यांमध्ये दर दिवशी सरासरी सुमारे १७७ टन वाहनांसाठीच्या एलपीजीची विक्री झाली होती. यातून पीएसयुज ओएमसीजद्वारे होणाऱ्या वाहनांसाठीच्या एलपीजीच्या विक्रीत जवळजवळ १०० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.











