होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भोंदूबाबा अशोक खरातला १२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

On: April 30, 2026 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत आहे, दरम्यान खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते, महिला अत्याचाराच्या आठव्या गुन्ह्यात तपास यंत्रणेने (एसआयटी) पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र आरोपीच्या वकिलांनी त्याला जोरदार विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयाने खरातला १२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरातवर एकूण १२ गुन्हे दाखल आहे. एक एक प्रकरणात एसआयटी त्यांचा तपासासाठी ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. (Crime News)

भोंदूबाबा खरातला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासी अधिकारी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी पक्षाने खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस कार्यालयातील झाडाझडतीत काही महत्त्वाचे पुरावे,सापडले होते, त्यात ‘काळा दगड’ आणि इतर वस्तू मिळाल्या आहे. त्याबाबत अधिक तपास करायचा आहे, असे सांगून पीडित कुटुंबाची त्याने आर्थिक फसवणूक ही केल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोपीची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद केला. त्याला आरोपीच्या वकिलांनी जोरदार विरोध केला.

आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले, गेल्या नऊ गुन्ह्यांत ज्या गोष्टींचा तपास झाला, त्यात आता नव्याने काय शोधणार? असा प्रश्न उपस्थित करत काळा दगड आणि चिंचोके यांचा काय तपास करणार? “आर्थिक व्यवहारांचा संशय आहे तर ते त्याचा उल्लेख इतर गुन्ह्यात नमूद नाही, मग आताच हे कसा समोर आला. सीसीटीव्ही आणि जुन्या तपासाचा दाखला देऊन त्यांनी पोलीस कोठडीला विरोध करत जोरदार युक्तीवाद करून विरोध केला.

आरोपी आणि सरकारी या दोन्हीची बाजू ऐकून घेत न्यायालयाने सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी अमान्य केली.आणि अशोक खरातला १२ मे पर्यंत पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. फसवणुकीच्या ९ व्या गुन्ह्यात खरातचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी शुक्रवारी न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment