होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

चोपड्यातील भाविक महिलेचे चारधाम यात्रेदरम्यान निधन; बद्रीनाथाच्या दर्शनाची आस अपूर्णच!

On: May 2, 2026 3:12 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जिल्ह्यातील चोपडा येथील (५९) वर्षीय प्रतिभा नारायण बोरोले यांचे उत्तराखंड राज्यात चारधाम यात्रेदरम्यान निधन झाल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून संबंधित यंत्रणांशी संपर्क साधल्याने पार्थिव मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चोपड्यातील पंकज नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रतिभा बोरोले या १६ भाविकांच्या गटासोबत चारधाम यात्रेसाठी रवाना झाल्या होत्या. यात्रेच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या गटाने क्रमाक्रमाने यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा केली होती. यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणून बद्रीनाथ मंदिर येथे दर्शन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, बद्रीनाथ दर्शनाच्या आदल्या दिवशी रात्री अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तसेच अस्वस्थता वाढू लागली. डोंगराळ भाग आणि उंचीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्याची माहिती सहप्रवाशांनी दिली. परिस्थितीचे गांभीर्य़ लक्षात घेता त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी धावपळ केली.

प्रतिभा बोरोले यांना तातडीने केदारनाथ परिसरातून खाली आणण्यात आले. आणि चमोली जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले, ऑक्सिजन सपोर्ट सुद्धा देण्यात आला. मात्र त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालीच नाही. अखेर एक मे रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या घटनेची माहिती चोपड्यात पोहोचताच संपूर्ण शहरात शोककळा पसरली. धार्मिक यात्रेदरम्यान अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही दुःख व्यक्त केले.

दरम्यान, प्रतिभा बोरोले यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, वैद्यकीय औपचारिकता जलदगतीने पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पार्थिव मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतिभा बोरोले या चोपड्याचे माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी तसेच पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या वहिनी आणि उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या काकू होत. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणून त्या सर्वांना एकत्र ठेवणाऱ्या, धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment