होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

(PWD): पीडब्लूडीचा लाचखोर अभियंता गजाआड; पाच लाखाची मागितली होती लाच..

On: May 9, 2026 5:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: लाचखोरीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे, दि, ९ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागात एक मोठी कारवाई करून शासकीय यंत्रणेतीळ बाबूंना मोठा संदेश दिला आहे. तुम्ही कोणी ही असा कारवाई होणारच, अशी मोहीम लाचलुचपत विभागाने उघडली आहे. या अंतर्गत एका ठेकेदाराला प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १५ लाखची लाच मागण्यात आली, मात्र ५ लाख रुपयांची तडजोड झाल्यावर लाच स्वीकारताना शाखा अभियंता योगेश अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यातील एका नोंदणीकृत कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत विविध विकास कामे केली होती. या कामांचे लाखो रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी कंत्राटदाराने शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी बिल मंजुरीसाठी १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तशी रीतसर तक्रार ही दिली. दरम्यान कंत्रादाराला एवढी मोठी रक्कम देण्याचा इरादा नव्हता, त्यामुळे त्याने लाचलुचपत विभागाला संपर्क साधला. तसेच कामाचे बिल काढून देण्यासाठी लाच मागत असल्याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानंतर पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने तक्रारीची शहानिशा केली तसेच त्यामध्ये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात एक सापळा रचण्यात आला.

कंत्राटदार आणि अभियंता यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार पहिल्या हप्ता ५ लाख रुपयांची रोकड स्वीकारत असतानाच लाचलुचपत पथकाने अचानक कारवाई करून शाखा अभियंता योगेश अहिरे यांना रंगेहात पकडले. या धडाकेबाज कारवाईने सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. अभियंत्यास ताब्यात घेतल्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment