Central Railway: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत अटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तसेच जुन्या पॅनेल विसर्जन करण्यासाठी शनिवार दि. 06 व रविवार 07.जून दरम्यान आसनगाव व थानसिट स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी २ वाजता सुरू करण्यात येऊन रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक राहणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे. या ब्लॉकमुले रेल्वे गाड्याच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यामुळे शनिवारी धावणाऱ्या पंचवटी आणि धुळे एक्सप्रेस या दोन एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे एक्सप्रेस, 11012 धुळे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड पंचवटी एक्सप्रेस, 12110 मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस या अप आणि डाऊन या गाड्यांचा समावेश आहे. तर काही गाड्या या वळविण्यात आल्या आहेत.
शॉर्ट टर्मिनेट- प्रस्थान स्थानकाबदल
* 17611 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 05 जून रोजी हजूर साहिब नांदेड येथून स्थानकावरून सुटून मनमाड स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. सदर गाड़ी मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान रद्द राहील.
* 12072 हिंगोली डेक्कन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी हिंगोली डेक्कन येथून स्थानकावरून सुटून नाशिक रोड स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. सदर गाड़ी नाशिक रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान रद्द राहील.
* 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याऐवजी मनमाड स्थानकातून आपल्या नियोजित वेळेनुसार सुटेल. सदर गाड़ी मुंबई ते मनमाड दरम्यान रद्द राहील.
* 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याऐवजी नाशिक रोड स्थानकातून आपल्या नियोजित वेळेनुसार सुटेल. सदर गाड़ी मुंबई ते नाशिक रोड दरम्यान रद्द राहील.

डाउन दिशेतील पुन:निर्धारित गाड्या
* 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा मेल दिनांक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 07 जून रोजी 01.20 वाजता सुटेल (प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी नियोजित वेळ 21.10 वाजता).
* 12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हावडा मेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक 07 रोजी 01.30 वाजता सुटेल (प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी नियोजित वेळ 22.15 वाजता).
* 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमृतसर एक्सप्रेस दिनांक 07 जून रोजी 02.00 वाजता सुटेल (प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी नियोजित वेळ 23.30 वाजता).
* 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष गाडी दिनांक 07 जून रोजी 04.00 वाजता सुटेल (प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी नियोजित वेळ 22.30 वाजता).
* 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बनारस महानगरी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 07 जून रोजी 02.15 वाजता सुटेल (नियोजित वेळ 00.15 वाजता).
* 02141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी प्रवास सुरू दिनांक 07 जून रोजी 02.30 वाजता सुटेल (नियोजित वेळ 00.20 वाजता).
* 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्सप्रेस दिनांक 07 जून रोजी 01.20 वाजता सुटेल (प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी नियोजित वेळ 22.00 वाजता).
* 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस दिनांक 07 जून रोजी 01.45 वाजता सुटेल (दि. 06 जून रोजी नियोजित वेळ 22.45 वाजता).
* 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्सप्रेस दिनांक 07 जून रोजी 02.00 वाजता सुटेल (दि. 06 जून रोजी नियोजित वेळ 23.35 वाजता).
* 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 07 जून रोजी 02.15 वाजता सुटेल (नियोजित वेळ 00.15 वाजता).
* 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस 07 जून रोजी 02.30 वाजता सुटेल (नियोजित वेळ 00.35 वाजता).
डाउन दिशेतील वळविण्यात आलेल्या गाड्या अशा आहेत, खालील गाड्या प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी कल्याण – कर्जत – पुणे – मनमाड मार्गे चालविण्यात येतील:
* 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस – बलिया कामायनी एक्सप्रेस
* 01027 दादर – गोरखपूर विशेष गाडी
* 15066 पनवेल – गोरखपूर एक्सप्रेस
* 11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बल्लारशाह एक्सप्रेस तसेच,
* 12131 दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 06 जुन रोजी कल्याण – कर्जत – पुणे – साईनगर शिर्डी मार्गे वळविण्यात येईल.
* 17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी कल्याण – कर्जत – पुणे – दौंड – मनमाड मार्गे वळविण्यात येईल.
अप दिशेतील गाड्यांचे नियमन प्रवास सुरू दिनांक 05 जून रोजी
* 01026 बलिया – दादर विशेष गाडी कसारा येथे 1 तास 45 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
* 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस इगतपुरी येथे 50 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
* 12810 हावडा – मुंबई मेल इगतपुरी येथे 20 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
* 20104 भाटनी – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस भुसावळ विभागात 10 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
* 11082 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाईल.
* 22537 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाईल.
* 11062 जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाईल.
* 01080 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाईल.
* 11203 नागपूर – मडगाव एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक 06 जून रोजी भुसावळ विभागात 30 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
हे ब्लॉक रेल्वे पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी तसेच सुरक्षित रेल्वे संचालनासाठी अत्यावश्यक आहेत. या कामांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.











