होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महागाईने कंबरडे मोडले: गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ, गृहिणीचे बजेट बिघडणार

On: June 7, 2026 12:29 PM
Follow Us:
---Advertisement---

LPG Price Hike: महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहे, इंधनाचे वाढते दर आणि महागाईने जनता मेटाकुटीस आलेली असताना नागरिकांना कुठलाच दिलासा मिळतांना दिसत नाही, आता केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९१३ वरून ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. देशातील इतर शहरांप्रमाणेच मुंबईतही २९ रुपयांचीच वाढ झाली असून, मुंबईतील दर ९१२.५० रुपयांवरून ९४१.५० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यापूर्वी मार्चमध्ये रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.(Cylinder Price Hike)

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची (Sharad Pawar) टीका

केंद्र सरकारचा दावा केला आहे की, आंतरराष्ट्रीय संकट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव असूनही, भारतातील गॅस जगातील अनेक देशांपेक्षा स्वस्त आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांना ६४२ रुपयांना सिलेंडर मिळत आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षानेही सरकारवर टीका केली आहे. तसेच प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं. परंतु नियंत्रित याचा अर्थ टप्प्या टप्प्यानं हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र दिसत आहे, अशी टीका करून सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल, असा इशारा ही दिला.

केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केली आहे. परिणामी,इतर शहरासह दिल्ली आणि मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९४२ रुपयांवर गेली आहे..तथापि, पेट्रोलियम मंत्रालयाचा दावा आहे की, भारतातील घरगुती ग्राहकांना जगाच्या आणि शेजारील देशांच्या तुलनेत अजूनही खूपच स्वस्त गॅस मिळत आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडर प्रत्यक्षात ६४२ रुपयांमध्ये मिळत आहे, तर त्याची वास्तविक किंमत १६०० रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

गॅस दर वाढीचे कारण (Gas CyIinder)

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, पश्चिम आशियातील संकट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयात करतो आणि त्याची किंमत सौदी करार दरानुसार ठरवली जाते. फेब्रुवारी २०२६ मध्ये एलपीजीची आंतरराष्ट्रीय किंमत प्रति टन सुमारे ५४३ डॉलर होती, जी जूनपर्यंत प्रति टन सुमारे ७९० डॉलरपर्यंत वाढली असून चार महिन्यांत अंदाजे ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मंत्रालयाच्या मते, जर घरगुती सिलेंडर पूर्ण बाजारभावाने विकले तर त्यांची किंमत १६०० पेक्षा जास्त जाईल, तथापि, सरकार हा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकत नसून सामान्य ग्राहकांना ९४२ रुपयांना सिलेंडर खरेदी करता येईल आणि उज्ज्वला लाभार्थ्यांना तो ६४२ रुपयांना मिळणार आहे. सरकारने दावा केला आहे की, भारतातील घरगुती गॅस अजूनही अनेक देशांपेक्षा स्वस्त आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील उज्ज्वला लाभार्थ्याला दिला जाणारा सिलेंडर पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या तुलनेत स्वस्त आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये घरगुती गॅसची किंमत भारतापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment