होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राष्ट्रवादीत पटेल- तटकरे यांचा वरचष्मा कायम, अनिकेत तटकरे यांच्यांनंतर राजेंद्र जैन यांची वर्णी

On: June 8, 2026 3:33 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: राज्यसभेची जागा सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली, आता राज्यसभेच्या या जागेवर प्रफुल पटेल यांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांची वर्णी लागली आहे. दरम्यान राज्यसभेच्या या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव जवळपास फायनल मानले जात होते. मात्र अचानक राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत राजेंद्र जैन यांचे नाव समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला. शेवटी राजकरणात काहीही होऊ शकते याची प्रचिती आली. मंत्री छगन भुजबळ यांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी अट ठेवली होती. त्यामुळेच छगन भुजबळ यांच्या राज्यसभेवर (Rajya Sabha Election 2026) जाण्याच्या मार्गात अडथळा ठरल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनील तटकरे आणि प्रफुल पटकरे या दोघांना बाजूला सारल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीत वर्चस्व कोणाचे याची ही चढाओढ दिसून येत होती. राष्ट्रीय कार्यकारणीतील यादीत या दोघा नेत्यांच्या नावापुढे पदे नव्हती, त्याने राजकीय वर्तुळात त्यांना डावलल्याची चर्चा होती. त्याचे पक्षातील महत्त्व कमी केल्याचे सांगण्यात येत होते. पार्थ पवार आणि तटकरे व पटेल यांच्या अंतर्गत धुसफूस असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत रायगडमध्ये भाजप आणि शिंदे गटात प्रचंड चुरस असतांना सुनील तटकरे यांनी आपली सर्व शक्तीपणाला लावून मुलगा अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळवून दिली. नुसती उमेदवारीचा दिली नाही, तर अनिकेत तटकरे यांना रायगड विधानपरिषदेत बिनविरोध निवडून आणले.

तटकरे व पटेल यांनी अवघ्या महिनाभरातच अनुक्रमे अनिकेत तटकरे आणि राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही आपला वरचष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. इकडे मात्र छगन भुजबळ यांनी पुतण्या समीरसाठी राज्यसभेवर जाण्याची तयारी दर्शविली होती. या[पूर्वी ही त्यांना अनेकदा खासदार होण्याची संधी होती, मात्र त्यांचे मन महाराष्ट्रात रमत असल्याने त्यांनी दिल्लीला जाणे पसंत नव्हते. यंदा मात्र पुतण्यास महाराष्ट्रात मंत्री बनवून स्वताः दिल्लीत जाण्यास तयार होते. परंतु पुतण्याला राज्यात मंत्री करण्यास पक्षांतर्गत अडथळे आल्याने त्यांचे ही दिल्लीत जाणे राहिले आहे. राजेंद्र जैन यांच्या निवडने सर्वच राजकीय गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादीत पुन्हा पटेल तटकरे ही जोडगोळी सक्रिय झाले आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment