होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट; जळगाव आणि राज्याचे तापमान कसे राहील ‘ते’ जाणून घ्या.

On: June 13, 2026 8:03 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे ४३.५ अंश नोंदवले गेले आहे. विदर्भातील अकोला, वर्धा यवतमाळ या ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सियसवर पोहचले आहे. अल निनोचा प्रभाव स्प्ष्टपणे आता जाणवत आहे, अर्धा जून महिना गेला आहे. राज्यात अद्याप पावसाचे लक्षण दिसत नाही, वातावरणात उष्मा कायम असून जीवाची लाही लाही होत आहे. जळगावचे तापमान ४१. ८ अंश सेल्सियस इअटके नोंदवले गेले आहे. तापमान उतरले असले तरी हवामान गरम झळा लागत आहे.

गेल्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला असून कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.
कोंकण गोवा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

कोलाबा हवामान विभागाचा इशारा

१३ – १७ जून: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता.

१३ जून: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची दाट शक्यता. कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता. महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट (heat wave) येण्याची दाट शक्यता.

१४ जून: महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची दाट शक्यता. कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता. महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता.

१५ जून: विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता. कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

१६ जून: विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता. कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता.

१७ जून: विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता.

पुणे हवामान विभाग: गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियस)

मुंबई (कुलाबा) ३६.०,
सांताक्रूझ ३५.२,
अनलबाग ३७.२,
रत्नानगरी ३३.५,
पणजी (गोवा) ३४.५,
डहाणू ३६.८,
पुणे ३५.९,
लोहगाव ३६.२,
अदहल्यानगर ४०.०,
जळगाव ४१.८,
कोल्हापूर ३४.०,
महाबळेश्वर २५.१,
मालेगाव ४२.८,
नानशक ३५.७,
सांगली ३५.५,
सातारा ३६.२,
सोलापूर ३९.३,
धारानशव ३७.१,
छत्रपती संभाजीनगर ३९.३,
परभणी ४०.०,
बीड ३९.५,
अकोला ४३.५,
अमरावती ४२.४,
बुलढाणा ४०.६,
ब्रह्मपुरी ४१.९,
चंद्रपूर ४०.८,
गोंददया ४०.६,
नागपूर ४१.०,
वधाज ४३.५,
यवतमाळ ४३.२.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment