होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

रेल्वेत भुसावळमधील महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास; एका महिलेला अटक

On: June 21, 2026 5:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: रेल्वेत चोरीच्या वाढत्या घटनांनी प्रवाशी हैराण झालं होते. पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावून चोरट्यावर नजर ठेवण्यास सुरवात केली तर एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. नाशिक रोड येथे रेल्वेत महिला प्रवासी गाडीमध्ये चढत असताना तिचे साडेचार लाखाचे दागिने चोरणाऱ्या प्रकार घडला होता. याप्रकरणी त्या महिलेस अटक करण्यात आली आहे. (Crime Update)

अशी केली चोरी

मिळालेली माहिती अशी की, दि १७ जूनला फिर्यादी अपर्णा श्रीगोंदेकर (रा. भुसावळ) या तपोवन एक्सप्रेसने नांदेडला जाण्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकात आल्या. तपोवन एक्सप्रेसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी त्यांच्या पर्समधील सोन्याचे गंठण असलेली छोटी पर्स चोरली. त्यांनी नाशिक रोड (Nashik Road Railway Police) रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

एक महिला ताब्यात

रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने स्थानक व परिसरातील पंधरा सीसीटिव्हींचे फुटेज तपासले. त्यातून संशयित महिलेची ओळख पटवून तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तिने आपले नाव लक्ष्मी गणेश सखरे (वय ४७, रा. अण्णा नगर, भोपाळ, मध्यप्रदेश, सध्या रा. दहावा मैल, ओझर, नाशिक) असे सांगितले. तिने दागिने चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस अधिक्षक संदीप पालवे (Sandip Plave) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आरपीएफचे निरीक्षक नवीन सिंग, गुन्हे शोध पथक प्रमुख संतोष उफाडे पाटील, गोविंद दाभाडे, शैलेश पाटिल, सचिन दैवे, सुभाष काळे, आरक्षक सागर वर्मा, नितीन मिस्त्री, केवल झाल्टे यांनी यशस्वी तपास केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment