होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

‘देवतारी त्याला कोण मारी’.. मालगाडीच्या वॅगनमध्ये सापडली नवजात बालिका; देवदूताच्या रूपात आले पोलीस जवान!

On: June 24, 2026 6:14 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal News: ‘देवतारी त्याला कोना मारी’..या वाक्याचा प्रत्यय ओढा रेल्वे स्थानकावर आला. स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यात एका नवजात बालिकेला टाकून देण्यात आले होते, ही बाब पोलीस जवानांच्या लक्षात आल्याने बालिकेचा जीव वाचविला. आरपीएफ आणि एमएसएफ जवानांच्या सतर्कतेमुळे साक्षात देवदूत आले असेच म्हणावे लागेल, त्यांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घटना अशी समोर आली

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ विभागातील (RPF) रेल्वे पोलीस फोर्सचे कॉन्स्टेबल योगेश गावड आणि एमएसएफ कर्मचारी प्रशांत जगताप हे रविवारी मध्यरात्री ओढा रेल्वे स्थानक परिसरात नियमित गस्त घालत होते. पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीची तपासणी करत असताना त्यांना एका डब्यातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर त्यांनी आवाजाच्या दिशेने जात पाहणी केली असता, मालगाडीच्या १३ व्या वॅगनमध्ये कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत एक नवजात बालिका आढळून आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ रेल्वे अधिकारी, जीआरपी पोलिस तसेच चाईल्डलाईन प्रतिनिधींना माहिती दिली.

पोलीस जवानांची सतर्कता

बालिकेची सुरक्षितता सुनिश्चित करत तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. नवजात बालिकेला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक येथे दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. कॉन्स्टेबल योगेश गावड आणि कर्मचारी प्रशांत जगताप यांनी दाखविलेल्या तत्परता, सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठेमुळे एका निष्पाप चिमुकलीचे प्राण वाचले. रेल्वे सुरक्षा दलाच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ अंतर्गत करण्यात आलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळे दोन्ही जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, नवजात बालिकेला अशा प्रकारे मालगाडीच्या डब्यात टाकून देण्याची घटना समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून बालिकेला टाकून देणाऱ्या व्यक्तींचा शोध संबंधित यंत्रणांकडून घेतला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment