Latest Weather Update: महाराष्ट्रात अद्यापही पेरणीलायक पाऊस झाला नसून शेतकरी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. मात्र पावसाने गेले दोन दिवस हुलकावणी दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यां मध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कुलाबा हवामान केंद्राने गोवा आणि महाराष्ट्रात १ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वादळ होण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर व समुद्रात ताशी ४० ते ५० किमी वेगाने (झोतासह ६० किमी प्रति तास) वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच २८ जिल्ह्याना येलो अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्रात मुक्ताईनगर (जळगाव) – 48 किमी प्रति ताशी, दोंडाईचा (धुळे) – 48 प्रति किमी तास, नियासम – बारामती (पुणे) – 44 ͩकिमी प्रति तास इतकं वेगाने वारा वाहत आहे. जळगावचे तापमान आता ३५ .५ अंश सेल्सियस इतके खाली आले आहे. मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. २९ जून रोजी हवामान विभागाने जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट सांगितला आहे.

तुरळक पावसाचा अंदाज
२९-३० जून: कोकण-गोवा आणि विदर्भात अनेक ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून १ जुलै रोजी कोकण-गोवा आणि विदर्भात अनेक ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
इशारा: वेगाने वारे वाहणार
२८-३० जून: कोकण-गोवा आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर व समुद्रात ताशी ४०-५० किमी वेगाने (झोतासह ६० किमी प्रति तास) वारे वाहण्याची शक्यता आहे.
१ जुलै: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर व समुद्रात ताशी ४०-५० किमी वेगाने (झोतासह ६० किमी प्रति तास) वारे वाहण्याची शक्यता आहे.










