होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Amravati News: अमरावतीत समृद्धी महामार्गावर ट्रक अन् कारचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

On: June 28, 2026 2:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Amravati Accident News:  महामार्गावरील अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात अपघाताची भीषण घटना घडली समोर आली आहे. समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 104 च्या नजीक ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर नेहमी अपघात होत आहेत. अशात आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ट्रक आणि वॅगनार कारचा हा भीषण अपघात असून यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर येत आहे. समृद्धी महामार्ग हा थेट नागपूर ते मुंबई सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी म्हणून देशभरात नावारुपाला आला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात अपघातात महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 104 च्या नजीक ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारमधील मृत झालेले सर्व प्रवासी चंद्रपूर येथील रहिवासी असून मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment