होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला फळ: प्रा.निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची यशाला गवसणी

On: July 18, 2026 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: चोपडा तालुक्यातील रहिवाशी नंदकिशोर सुकदेव जाधव यांची सुकन्या कुमारी कावेरी जाधव हिने धुळे येथील प्रा.निकम कॉलेज, अंतिम वर्ष बी. फार्मसी परीक्षेत 8.21 सीजीपीए गुणांनी प्रथम क्रमांक मिळवला, या यशाबद्दल कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य तसेच शिक्षक यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले.

जळगाव गोंदूर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी) च्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बी.फार्मसी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून फार्मसीच्या निकालात निकम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विदयार्थ्यांच्या अभ्यासातील चिकाटीने यशाला गवसणी घातली आहे. प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्ष बी. फार्मसी परीक्षेत जाधव कावेरी नंदकिशोर हिने ८.२१ सीजीपीए प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर कापडणे अभिषेक शरद ८.२० सीजीपीए द्वितीय, तर पाटील जागृती चैतराम हिने ८.११ सीजीपीए गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय वर्ष बी. फार्मसी परीक्षेत नावरकर उज्ज्वल दिलीप ८.०४ सीजीपीए प्रथम, तसेच सोनवणे तुषार ज्ञानेश्वर ८.०३ सीजीपीए द्वितीय, तर रेलन दिशा विजय ८.०२ सीजीपीए तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

या यशात संस्थेच्या प्राध्यापक आणि प्राचार्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सचिव शुभांगी निकम, उपाध्यक्ष रोहित निकम, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी कौतूक केले. तसेच त्यांचे अभिनंदन केले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment