होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आंदोलक संसद भवनावर धडकले: वांगचुक म्हणाले, मला संसदेतील मोर्चात सहभागी व्हायचंय; सौरभ दास आणि आशुतोष यांची जेपी नड्डा यांच्याशी भेट

On: July 20, 2026 2:32 PM
Follow Us:
---Advertisement---

Cockroch Janta Party: आपले सर्व आरोग्य मापदंड सामान्य असल्याचे सांगून सोनम वांगचुक यांनी सफदरजंग रुग्णालयातून डिस्चार्जसाठी अर्ज केला. ‘पार्लमेंट मार्च’मध्ये सहभागी होता यावे यासाठी त्यांना तात्पुरती सुट्टी द्यावी, अशी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला विनंती केली. दरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’चे मुख्य प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, मी आणि आशुतोष रांका कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना भेटायला जात आहोत. सरकार सकाळी चर्चेसाठी आले आहे. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. दरम्यान तरुण मोठ्या संख्येने जमले असून मोर्चा संसदेवर धडकला आहे. सीजेपीचे आंदोलक संसद भवनाच्या गेटवर पोहोचले तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण क्षेत्रात सुधारणा करा आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सीजेपीने जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. इकडे सरकार आणि आदोलकांमध्ये चर्चा सुरू असतानांच हळूहळू आंदोलक संसद भवनाकडे सरकत होते. तरुण संसद भवन येथे पोहचून आंदोलन करत आहेत. अखेर सरकारने आदोलकांशी पोलिसांच्या माध्यमातून चर्चा सुरू केली. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे मुख्य प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, मी आणि आशुतोष रांका कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना भेटायला जात आहोत. सरकार सकाळी चर्चेसाठी आले आहे. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत.

सीजेपीकडून सरकारवर टीका

चर्चेचे आवाहन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने सरकारवर टीका केली आहे. सीजेपीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, “हा शिक्षणमंत्र्यांचा विषय आहे आणि आरोग्यमंत्री त्यावर चर्चा करतील.” आता पर्यंत सरकार कडून कोणीच आंदोलनाची दखल घेण्यास पुढे आले आहे. मात्र सकाळी आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले अणे त्यांनी जंतरमंतर येथे जमून संसदेकडे कूच केली.

माजी मुख्यमंत्री अतिशी, सिसोदिया सहभागी

संसदेच्या मोर्चाच्या आवाहनादरम्यान, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी आणि माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया, खा. संजय सिंग जंतर मंतरवर पोहोचले आहेत. कॉकरोच जनता पार्टीने त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच आदोलनात आल्याचे सांगितले आहे.

खा. डिंपल यादव आंदोलनात

या आदोलनाला पाठींबा देण्यासाठी समाजवादी पार्टीच्या खा. डिंपल यादव, इक्रा हसन, प्रिया सरोज, झियाउर रहमान बर्क, राजीव राय, रुची वीरा आणि धर्मेंद्र यादव यांच्यासह समाजवादी पक्षाचे अनेक खासदार या आंदोलनात सामील झाले. त्यांनी ‘नीट आहे की चीट आहे’ असे लिहिलेले फलक हातात धरले होते. दरम्यान, सपा खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी ‘चलो संसद’ मोर्चासंदर्भात संसदेबाहेर एक महत्त्वपूर्ण विधान केले. आपली नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, देशातील मुलांना लाठीचार्जला सामोरे जावे लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

विद्यार्थ्यांसाठी खा. शरद पवार मैदानात, थेट जंतम-मंतर गाठले; तरुणांच्या आदोलनाला समर्थन

विरोधीपक्ष नेते खा. राहुल गांधी यांचा पंतप्रधानच्या निवासस्थानावर मोर्चा; रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची ही घेतली भेट

नीट पेपरफुटी प्रकरण: पंतप्रधानाचे महत्त्वाचे विधान; काय म्हणाले ते जाणून घ्या

लाठीचार्जनंतर: सोनम वांगचुक आपले उपोषण सुरूच ठेवणार; आंदोलनाचा आज निर्णायक दिवस, जंतर-मंतरवर सुरक्षेत वाढ

सीजेपी आंदोलनाने सरकार नरमले, मंत्री जे पी नड्डा नेतृत्वाशी चर्चा करणार; ‘या’ आहेत सीजेपीच्या मागणी

सीजेपीचा दावा, अभिजित दीपके पोलिसांच्या ताब्यात;..तर पोलीस म्हणाले, दिपके ताब्यात नाही! दीपकेंनी उपोषण सोडले

Leave a Comment