होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खान्देशच्या प्रवाश्यांनो लक्ष द्या: मुसळधार पावसामुळे ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

On: July 24, 2026 6:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक घाटमाथा परिसरात रात्री अत्यंत मुसळधार पाऊस झाला. आज देखील नाशिक परिसराला येलो अलर्ट देण्यात आला असून आज मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रेल्वे गाड्या शुक्रवारी (दि.२४) आणि शनिवारी (दि.२५) रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. प्रवाश्यांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्यावत स्थिती तपासून घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

रद्द केलेल्या गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे

प्रवास दिनांक २४ जुलै रोजी गाडी क्रमांक ०९०५० भुसावळ – दादर विशेष ही भुसावळ येथून पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक २०९२५ सूरत – अमरावती एक्सप्रेस ही सूरत येथून पूर्णतः रद्द झाली. गाडी क्रमांक १९१०५ उधना – भुसावळ एक्सप्रेस ही उधना येथून पूर्णतः रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक १९१०६ भुसावळ – उधना एक्सप्रेस ही भुसावळ येथून पूर्णतः रद्द झाल्याचे कळविण्यात आले आहे.

प्रवास दिनांक २५ जुलै

*गाडी क्रमांक २०९२६ अमरावती – सूरत एक्सप्रेस अमरावती येथून पूर्णतः रद्द.

*गाडी क्रमांक ०९०५१ दादर – भुसावळ विशेष ही दादर येथून पूर्णतः रद्द.

*गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ – दादर विशेष भुसावळ येथून पूर्णतः रद्द

*रेल्वे प्रवाशांनी प्रवासास निघण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment