होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

हवामान स्थिती: जळगावला आज रेड अलर्ट, अत्यंत मुसळधार पाऊस; उद्या कसे असेल हवामान ‘ते’ जाणून घ्या

On: July 30, 2026 12:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: गेल्या एक महिन्यापासून असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा संपली असून जळगावला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. आज अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सकाळपासूनच पाऊस बरसण्यास सुरुवात झाली असून, वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना अखेर पावसाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यात बहुसंख्य ठिकाणी पाऊस सुरू असून जळगावला मुसळधार पावसाची गरज होती, मात्र पावसाने हुलकावणी दिली. काही दिवस हलक्या सरी बरसल्या मात्र, त्यामुळे ना पिण्याची ना शेतीची गरज भागली असती. आज रेड अलर्ट दिल्याने सकाळपासूनच अतिमुसळधार पाऊस बरसत आहे.

जळगावला (शुक्रवार) उद्याही मुसळधार पाऊस

मुसळधार पावसाने शहरवासीयांना हायसे वाटले आहे. परिसरात ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले होते, तसेच, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, आता लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतांना दिसत आहे. दरम्यान उद्या जळगावला येलो अलर्ट दिला असल्याने उद्या अतिमुसळधार पाऊस असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दि १ ते ३ ऑगस्टला पुन्हा ग्रीन अलर्ट असून हलक्या- मध्यम पावसाचा अंदाज आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

नाशिक आणि घाट परीसर आणि धुळे जिल्हयाला ऑरेंज अलर्ट म्हणजे अत्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. या ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे. नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट असून अति मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. उद्या शुक्रवारी धुळे आणि नाशिक घाट परिसराला अति मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

शुक्रवारी ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दरम्यान गुरुवारी राज्यातील एकूण १६ जिल्हा आणि काही घाट परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामध्ये रायगड, कोल्हापूर-पुणे-नाशिक-सातारा घाट परिसर, धुळे, संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, गडचिरोल, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच शुक्रवारी १० जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच उद्या शुक्रवारी सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. त्यात पालघर, रायगड, धुळे, नाशिक-पुणे आणि सातारा घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment