होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नंदुरबारचे पदाधिकारी विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी; भाजप मंत्र्यांसोबतच्या ऑडिओ क्लिपमुळे पडली विकेट?

On: August 17, 2026 4:56 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: भारतीय जनता पक्षाचे नंदुरबारमधील नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून सातत्याने व्हायरल होणाऱ्या विविध कथित ऑडिओ क्लिप्समुळे भाजप पक्षाने ही मोठी कारवाई केल्याचे सांगण्यात येते. चौधरी यांच्या विरोधात रावेरचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही नाराज होते. त्यांनी निषेद ही नोंदवला होता. त्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. त्यासंदर्भात भाजपने अधिकृत पत्रक जारी केले असून विजय चौधरी यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपचे माजी महामंत्री तथा नेते विजय चौधरी यांच्या वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिपमुळे भाजपला अडचणीत आणण्याचे काम केले. जेष्ठ आणि दिग्ग्ज नेत्यांविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या होत्या. कधी पक्ष तर कधी शासकीय अधिकारी, कधी थेट मंत्र्यांसोबतच्या संवादाच्या ऑडिओ टेप समोर आल्याने नंदुरबारमधील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय होता. त्याने राजकीय वातावरण देखील तापले होते. या कथित ऑडिओ क्लिप्समधून चौधरी आणि पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांचे कथित संभाषण समोर आल्याने भाजपला नामुष्की पत्करण्याची वेळ आली होती, अखेर भाजपने याची दखल घेत त्यांची हकालपट्टी केली आहे, अशा आशयाचे वृत्त एका वृत्तवाहिनीने ही दिले आहे,

दरम्यान महत्त्वाचे म्हणजे एका ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सून तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, या सर्व ऑडिओ क्लिप्समध्ये ‘एआय’च्या मदतीने छेडछाड करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी यांनी केला होता. मात्र, त्यावर रावेर आणि जळगाव मधील कार्यकर्त्यांनी विजय चौधरी यांच्या हाकालपट्टीची मागणी लावून धरली होती, एवढेच काय कमी होते, त्यानंतर विजय चौधरी यांची मंत्री जयकुमार रावल यांच्या सोबतची कथित टेप ही व्हायरल झाल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. तसेच आणखी एका ऑडिओ क्लिपमधून भाजप नेते विजयकुमार गावित यांच्या कुटुंबीयांवर देखील विधान करण्यात आले होते, त्यात माजी खा. डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment