होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर: ५० वंदे भारत स्लीपर ट्रेन्स लवकरच रुळांवर धावणार! आता रात्रीचा प्रवास होणार अधिक आरामदायी

On: August 18, 2026 7:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Vande Bharat Train Update: भारतीय रेल्वेचा कायापालट होत असून अत्याधुनिक सेवा सुविधा देणाऱ्या नव्या रेल्वे लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. त्यादृष्टीने भारतीय रेल्वेने अधिक वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करून आपल्या प्रीमियम लांब पल्ल्याच्या रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस ही दिवसा धावणारी चेअर कार ट्रेन म्हणून चालवली जात होती, परंतु प्रवाशांनी रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर आवृत्तीची बऱ्याच काळापासून मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरी आता (ICF) प्रत्येकी २४ डब्यांचे ५० वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट तयार करणार आहे. या नवीन ट्रेनसेटमुळे प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता असून देशभरातील लांब पल्ल्याच्या मार्गांवर वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्यास मदत हॊणार आहे.

दरम्यान रात्रीच्या प्रवासासाठी आणि दोन शहरांमधील प्रवाशांना जलद, अधिक आरामदायक आणि आधुनिक प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या या प्रस्तावित विस्तारामुळे, देशाच्या प्रीमियम रेल्वे प्रवास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

आयसीएफचे महाव्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी सांगितले की, स्वदेशी बनावटीच्या २४ डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटचे उत्पादन आराखडे पूर्ण झाले आहेत. या आराखड्यांमध्ये डब्यांची रचना, डबे जोडण्याची प्रणाली आणि खाली बसवण्यात येणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे.

नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनचे महत्त्वाची वैशिष्ट्ये

*डब्यांची रचना, डबे जोडण्याची प्रणाली आणि अंडरफ्रेम उपकरणांशी संबंधित आराखडे पूर्ण झाले आहेत.

*या अतिरिक्त ट्रेनसेटमुळे रेल्वेला अधिक लांब पल्ल्याच्या मार्गांवर वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्याचा विचार करण्यास मदत होईल.

*आयसीएफ चेन्नई ५० वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटची निर्मिती करणार आहे.

*आगामी ट्रेनसेटमध्ये २४ डबे असतील, तर सध्याच्या स्लीपर ट्रेनमध्ये १६ डबे आहेत.

*२४ डब्यांची ट्रेन १६ डब्यांच्या ट्रेनपेक्षा अंदाजे दीडपट अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढेल

*स्लीपर सुविधेचा उद्देश रात्रीच्या आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एक जलद आणि अधिक आरामदायक पर्याय उपलब्ध करून देणे आहे.

*भारतीय रेल्वेने अद्याप डब्यांची अंतिम संख्या अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, तथापि, अहवालानुसार २४ डब्यांच्या ट्रेनसेटमध्ये १७ एसी ३-टियर डबे, पाच एसी २-टियर डबे, एक एसी फर्स्ट क्लास डबा आणि एक पॅन्ट्री कार असू शकते.

वंदे भारत स्लीपर ट्रेन नेटवर्कच्या विस्ताराची तयारी

*वंदे भारत स्लीपर सेवा सध्या हावडा आणि कामाख्या दरम्यान चालते. सध्याच्या ट्रेनमध्ये ११ थर्ड एसी डबे, चार सेकंड एसी डबे आणि एक फर्स्ट एसी डबा आहे.

*प्रस्तावित २४ डब्यांच्या गाड्यांमुळे प्रवासी क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. तथापि, रेल्वेने अद्याप या नवीन गाड्यांसाठी डब्यांची अंतिम रचना जाहीर केलेली नाही.

*लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी जलद आणि अधिक आरामदायक गाड्या उपलब्ध करून देण्याच्या रेल्वेच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

अमृत भारत एक्सप्रेस ३.० बाबत अपडेट

अमृत भारत एक्सप्रेस ३.० बाबतही एक अपडेट जारी करण्यात आले आहे. आयसीएफने (ICF) पुढच्या पिढीच्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांविषयी माहिती दिली आहे. अमृत भारत ३.० मध्ये एसी, जनरल आणि स्लीपर क्लासचे डबे असण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.

मात्र, सध्याच्या अमृत भारत गाड्यांमध्ये प्रामुख्याने जनरल आणि स्लीपर डबे आहेत. पुढच्या पिढीच्या गाड्यांमध्ये एसी डब्यांचा समावेश केल्याने, आणखी जास्त प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येईल. (ICF) आयसीएफमधील अलीकडील घडामोडींनुसार, वंदे भारत स्लीपर आणि पुढच्या पिढीच्या अमृत भारत गाड्यांच्या उत्पादनाचे नियोजन प्रगतीपथावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

नेपाळ विनाशकारी पूर अन् भूस्खलन: मृतांची संख्या ६२६ वर पोहोचली

Leave a Comment